क्रीडा-अर्थमत

आज खुला होणार ‘कृष्णा’चा आयपीओ 

मुंबई :
भारतातील सर्वाधिक मोठ्या विविधांगी डायग्नॉस्टिक्स सेवा पुरवठादार कंपन्यांपैकी एक असणाऱ्या (स्त्रोत: क्रिसील अहवाल) कृष्णा डायग्नॉस्टिक्स लिमिटेड कंपनीने त्यांची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) ४ ऑगस्ट २०२१ पासून खुली होत असल्याचे जाहीर केले आहे.

या योजनेचा प्रत्येक समभागासाठीचा किंमतपट्टा ९३३ रुपये ते ९५४ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान १५समभागांसाठी आणि त्यानंतर १५ च्या पटीत अर्ज करता येणार आहे. ही ऑफर शुक्रवार ६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल.

 

या योजनेत चार दशलक्ष रुपये मूल्याचे नवीन समभाग (“Fresh Issue”) आहेत आणि  ८,५२५,५२० इक्विटी समभाग (Offered Shares) विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये १,६००,००० पर्यंतचे इक्विटी समभाग फीकॅपिटल ट्रस्ट-फी कॅपिटल ग्रोथ फंड-इ, (विक्री समभागधारक १), ३,३४०,७१३ पर्यंतचे इक्विटी समभाग कितारा पीआयआयएन ११०४ (विक्री समभागधारक २), ३,५६३,४२७ पर्यंतचे इक्विटी समभाग समरेस्ट इंडस हेल्थकेअर फंड लिमिटेड (विक्री समभागधारक ३) आणि २१,३८० पर्यंतचे इक्विटी समभाग लोटस मॅनेजमेंट सोल्युशन्स (मयूर सरदेसाई यांच्यातर्फे कार्यरत) (विक्री समभागधारक ४) यांचा समावेश आहे. योजनेत २००.०० दशलक्ष रुपये मुल्यांपर्यंत पात्र कर्मचाऱ्यांसाठी (Employee Reservation Portion )राखीव आहे. 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: