गोवा 

शिरगावच्या देवी लईराईचा जत्रोत्सव रद्द

डिचोली :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव कोरोना महासाथीमुळे या वर्षीही रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सरकारच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देवीचा जत्रोत्सव 16 मे रोजी सरकारच्या आदेशाचे पालन करून मर्यादित स्वरुपात केला जाईल.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही व्रतस्थ धोंड भाविकांनी आपल्या घरीच राहून व्रत करावे. कोणीही मंदिरात व उत्सवाच्या दिवशी येऊ नये. घरी राहुनच देवीचे नामस्मरण करावे व देवस्थान समितीस सहकार्य करावे, असे आवाहन लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर व समितीने केले आहे.

lairai

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: