सातारा 

रेंगडी गावाला भूस्सखलनाचा धोका 

मेढा (प्रतिनिधी) :
जावली तालुक्यातील केळघर घाटातील रेंगडी गावामध्ये  भूस्सखलनाचा  गंभीर इशारा देण्यात आला आहे.  वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण सातारा यांनी केलेल्या सर्वेमध्ये रेंगडी हे गाव खचण्याचा धोका निर्माण झाला असून, या गावाला तत्काळ धोक्याचा इशारा दिल्यामुळे जावली तालुक्यांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.  जावली तहसिल कार्यालयाला वरिष्ठ वैमानिक भुजल सर्वेनी दिलेल्या अहवालामध्ये रेंगडी फाटा ते रेंगडी गावठाण दरम्यान मुकवली व वाटांबे गावांच्या पश्चिमेस व दक्षिण बाजुस रस्त्याला  भूस्सखलनामुळे भेग पडली आहे. या ठिकाणी २५ मीटर भूस्सखलन झाले असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

अतिपर्जन्यमानामुळे  भूस्सखलनाला सुरुवात झाली आहे. झऱ्यावरचा भाग भूस्सखलनामुळे घाटात मेढा महाबळेश्वर रस्त्यावर ढासळण्याचा गंभीर इशारा दिला आहे . मेढा महाबळेश्वर रस्त्यालगत २० मीटर अंतरावर नव्याने  भूस्सखलन होण्याचा गंभीर इशारा वरीष्ठ भुजल वैज्ञानिकांच्या अहवालात देण्यात आला आहे.
रेंगडी फाटा व रेंगडी गावठाण रस्त्याच्या वरच्या बाजुस पश्चिमेकडील बबन सपकाळ व हरीबा कासुर्डे यांचे शेतीतील पावसाचे पाणी मुरल्यामुळे पावसाचा कालावधी वाढल्याने  भूस्सखलनाचा धोका गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबत जावली महसुल काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. केळघर घाटादरम्यान रस्त्याचे काम सुरु असुन  भूस्सखलनाबद्दल कोणतीही गंभीर दखल न घेता फक्त डांबर टाकण्याचे काम सार्वजनिक बाधकाम विभागाकडुन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्याची सुरक्षितता अधांतरीच राहिली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: