गोवा 

‘पक्षातर्फे ​निवडणूक तर मीच लढवणार’

पेडणे (प्रतिनिधी) :
आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार आणि आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला.
दोन दिवसापूर्वी आपण निवडणूक लढवणार आणि पक्ष आपल्याला उमेदवारी देणार अशी आपण प्रतिक्रिया दिली. मात्र आता आमदार सोपटे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे कागदी घोडे नाचवले त्यावरून कुणाची नीती आणि मती भ्रष्ट झाली ते कळते. आणि आपण पुढची साडेपाच वर्षे आराम आणि व्यायाम करावा असे सोपटे यांना का वाटते? आपण केवळ पुढील पाच वर्षेच जगणार का? असा सवाल करून सोपटे वैफल्ग्रस्त  झाले आहेत. त्यांनी खालची पाताळी गाठून आमदाराला न शोभणारे व्यक्तव्य केले, असे पार्सेकर यांनी यावेळी नमूद केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: