क्रीडा-अर्थमत

‘या’ ठिकाणी मोफत शिका ब्लॉकचेन

मुंबई :
ब्लॉकचेन तंत्रज्ञान विषयाचा विनामूल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी हरिद्वारस्थित गुरुकुल कांग्री (डीम्ड युनिव्हर्सिटी)ने भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्स्चेंज वझीरएक्स (WazirX) बरोबर सहयोग साधला आहे. सोमवारी ३ जानेवारी २०२२ रोजी या अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला असून आतापर्यंत १०,००० हून अधिक लोकांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना गुरुकुल कांग्रीतर्फे गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत येणा-या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनअंतर्गत डीम्ड युनिव्हर्सिटी आहे.

गुरुकुल कांग्री आणि वझीरएक्स उन्लु क्लासेसच्या सहयोगाने आपल्या रिसर्च आणि अनॅलिसिस प्लॅटफॉर्म ब्लॉकचेन पेपर्सच्या माध्यमातून अभ्याससाहित्याचे वितरण करत आहेत. हा द्विभाषिक अभ्यासक्रम इंटरनेटची सोय असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध असणार आहे. ब्लॉकचेन-आधारित तंत्रज्ञानाविषयीच्या सखोल ज्ञानाने सुसज्ज भारतीय युवकांना क्रिप्टो उद्योगक्षेत्रातीलविस्तारणा-या रोजगाराच्या संधींचा शोध घेणे शक्य होईल.

हा विनामूल्य ब्लॉकचेन अभ्यासक्रम म्हणजे ब्लॉकचेन आणि क्रिप्टो परिक्षेत्रातील प्राथमिक संकल्पना समजून घेण्याची आस असलेल्या होतकरू उमेदवारांसाठी शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याची एक संधी आहे. क्रिप्टो आणि ब्लॉकचेन उद्योगक्षेत्राची सखोल समज मिळवून देत रोजगारनिर्मितीस सहाय्य करणारा हा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना फिनटेक कंपन्या आणि ब्लॉकचेन स्टार्टअप्समध्ये ब्लॉकचेन डेव्हलपर्स, डिजिटल पेमेंट ऑपरेशन क्षेत्रातील विविध पदे, सोशल मीडिया मार्केटिंग, कन्टेन्ट क्रिएशनसारख्या रोजगाराच्या संधींचा शोध घेता येईल. तसेच त्यांना क्रिप्टोचे ज्ञान असलेले इन्फ्लुएन्सर बनून सल्लागाराची भूमिका निभावता येईल. प्रमाणपत्र आणि मान्यतेमुळे आजच्या तरुणाला क्रिप्टो उद्योगक्षेत्रामधील कारकिर्दीचा सक्रियपणे पाठपुरावा करता येईल, ज्यात ट्रेडिंगमधील क्रिप्टोचा वापर, पी२पी पेमेंट्स, रेमिटन्सेस आणि रिटेल यांचा समावेश असून भारतामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये या क्षेत्राने ३९ टक्के वाढ नोंदवली आहे. https://blockchainpapers.in/learn-blockchain-get-certified-eng/ मोफत अभ्यासक्रमासाठी येथे नोंदणी करा.

गुरुकुल कांग्रीचे रजिस्ट्रार सुनिल कुमार म्हणाले, “भारतीय युवकांना त्यांच्या सोयीच्या भाषेमध्ये अत्याधुनिक वित्तीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही गुरुकुलसाठी आनंदाची बाब आहे. वझीरएक्स आणि आमच्या तंत्रज्ञान विभागाचा हा नाविन्यपूर्ण सहयोग या प्रगतीशील क्षेत्राविषयीचे ज्ञान मिळविण्याच्या कामी मार्गदर्शन करेल आणि भारताच्या भावी पिढ्यांना या ज्ञानाचा लाभ घेण्यास मदत करेल. हा कार्यक्रम आमच्या #पढेगादेशबढेगादेश उपक्रमांतर्गत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याने, या अभ्यासक्रमासाठी उत्तर प्रदेशातील १०,००० हून अधिक डिजिटल नोंदण्या आधीच झाल्या आहेत.”

वझीरएक्सचे संस्थापक आणि सीईओ निश्चल शेट्टी म्हणाले, “भारत सध्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधील एका अत्यंत आशादायी वळणावर उभा आहे आणि भविष्यातील बदलांसाठी देशातील तरुणांनी आधीच सज्ज राहावे याची काळजी हा कार्यक्रम घेईल. आजघडीला आणि आजच्या युगामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची प्रचंड व्याप्ती समजून घेणे आणि हे तंत्रज्ञान आपल्या व्यवसायाच्या तसेच मिळकतीच्या कक्षा कोणत्या पातळीपर्यंत रुंदावू शकते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारताला क्रिप्टो क्रांतीमध्ये आघाडीचे स्थान मिळवून देण्यावर आणि ब्लॉकचेन व क्रिप्टो प्रशिक्षणाची एक सुरक्षित परिसंस्था विकसित करण्याच्या कामी या उद्योगक्षेत्राला सहकार्य करू शकेल, अशी सहजसोपी आणि सुरक्षित कम्युनिटी उभारण्यावर आमचा भर असणार आहे.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: