गोवा 

‘टीका उत्सवातून करुया कोरोनावर मात’

पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांचे आवाहन

पेडणे (प्रतिनिधी) :
कोरोनावर आता आम्हाला मात करायची असेल तर सर्वांनी कोरोना लस घेवून आपली सुरक्षा मजबूत करावी , प्रत्येकानी टीका उत्सवात सहभाग होवून लस घेण्याचे आवाहन पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी १ रोजी नानेरवाडा येथील रुद्रेश नागवेकर यांच्या निवास्थानी सभागृहात पेडणे पालिका क्षेत्रातील ४५ वर्षावरील नागरिकाना कोरोना लस घेण्यासाठी  टीका उत्सव आयोजित केला होता , त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर , नगरसेवक शिवराम तुकोजी , भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , नगरसेवक सिद्धेश पेडणेकर , पांडुरंग परब आदी उपस्थित होते .

केंद्र आणी राज्य सरकारच्या आरोग्य खात्या तर्फे गावागावात टीका उत्सव आयोजित केला जात आहे . त्या उपक्रमाला गावागावातून उदंड प्रतिसाद मिळत आहे . दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लस देण्याची  मोहीम पेडणे पालिका क्षेत्रात आयोजित केली होती . त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी टीका उत्सवासाठी स्वत:च्या घरची जागा उपलब्ध करून देताना पूर्ण पालिका क्षेत्रात या टीका उत्सवाविषयी जनजागृती केली .यावेळी नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना कोरोनाची साखळी मोडीत काढण्यासाठी सर्वांनी संघटीत होवून काम करुया असे आवाहन केले. पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी बोलताना कोरोना काळात प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे , त्यासाठी सरकारने गावागावात टीका उत्सवाची सोय केली आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: