क्रीडा-अर्थमत

ग्रामीण भागातील विमा संरक्षणासाठी ‘यांनी’ घेतला पुढाकार

मुंबई :
लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत धोरणात्मक करार करण्याची घोषणा आज केली.

बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय औरंगाबाद मध्ये असून ते संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी रीजनल रूरल बँक (आरआरबी) आहे आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी सरकारच्या पाठिंब्याने कार्यरत ४३ ग्रामीण बँकांपैकी एक आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्याच्या ४१२ शाखांमधून सुलभ बँकिंग आणि पत सेवा उपलब्ध आहेत.

या भागीदारीमुळे औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, ठाणे आणि नाशिक अशा सात प्रांतांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा नेटवर्कमार्फत लिबर्टी जनरल इन्शुरन्सच्या उत्पादनांचे वितरण सक्षम होईल.

या भागीदारीमुले लिबर्टी जनरल विमा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना आरोग्य विमा, दुचाकी आणि मोटर विमा सह अन्य सामान्य विमा उत्पादनांची व्यापक श्रृंखला उपलब्ध होईल.

रूपम अस्थाना, लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ आणि होल टाईम डायरेक्टर या वेळी बोलताना म्हणाले, ”महाराष्ट्र ग्रामीण बँकेबरोबरची आमची भागीदारी एका विश्वासार्ह भागीदाराच्या माध्यमातून बाजारपेठेतील अग्रगण्य उत्पादने देशाच्या पारंपारिकपणे कमी विमा उपभोगते असलेल्या जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेबरोबरची भागीदारी लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेडच्या महाराष्ट्रातील विस्तारास दिशा देईल आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड बँकेच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि उत्पादने प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.’’

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “महाराष्ट्र ग्रामीण बँक मधील आम्हा सर्वांना विश्वास आहे की लिबर्टी जनरल इन्शुरन्स बरोबरची बॅंकेशुरन्स भागीदारी बँकेच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये मौलिक वृद्धी तर करेलच पण त्याच बरोबर बँकेला सर्वसाधारण विमा उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादने ग्राहकांना सादर करण्याची संधी उपलब्ध करून देईल

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: