क्रीडा-अर्थमत

भारतात ‘बॅरीसिटीनिब’साठी लिलीसोबत परवाना करार

मुंबई :
एमएसएन लॅब्सने (एमएसएन) भारतात कोविड-१९ साठी बॅरीसिटीनिबचे उत्पादन व मार्केटींग सुरु करण्यासाठी यूएसएच्या एली लिली अँड कंपनीसोबत रॉयल्टी-फ्री, नॉन-एक्सक्लुसिव्ह, ऐच्छिक परवाना करार केला असल्याची घोषणा केली.

कोरोनाच्या संशयित किंवा प्रयोगशाळेतील तपासणीअंती निश्चित निष्कर्षानुसार आजारी, रुग्णालयात दाखल असलेल्या आणि पूरक ऑक्सिजन, बाहेरून यांत्रिकी व्हेंटिलेशन किंवा एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) यांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी आणीबाणीच्या प्रसंगी रेमडेसिवीरसोबत बॅरीसिटीनिब या औषधाच्या रिस्ट्रिक्टेड इमर्जन्सी वापराला सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने भारतात मान्यता दिली आहे.

एमएसएन ग्रुपचे सीएमडी डॉ. एमएसएन रेड्डी यांनी सांगितले, “एली लिली अँड कंपनीसोबत ही भागीदारी भारताच्या कोरोना विरोधातील लढ्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि बॅरीसिटीनिबची उपलब्धता व किफायतशीरता वाढवण्यासाठी सहायक ठरेल.”

एमएसएन हे उत्पादन बॅरीडोझ या ब्रँड नावाने २ एमजी व ४ एमजी अशा दोन प्रमाणात आणणार आहे.  एमएसएनने ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल सामग्री आणि बॅरीसिटीनिबचे फॉर्म्युलेशन आपल्या स्वतःच्या संशोधन व विकास आणि उत्पादन युनिट्समध्ये विकसित केले आहे. कोरोना उपचारांमधील औषधांच्या श्रेणीमध्ये एमएसएनने फेविलो (फेवीपिरवीर) २०० एमजी, ४००एमजी व ८००एमजी प्रमाणात आणि ओसेलो (ओसेलटॅमिविर) ७५ एमजीच्या कॅप्स्यूल्स स्वरूपात याआधीच दाखल केली आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: