देश-विदेश

‘अ‍ॅप’द्वारे मिळणार आता घरपोच मद्य

नवी दिल्ली :
दिल्ली राज्य सरकारने मद्याच्या होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी मद्याची ऑर्डर दिली जाऊ शकते. यामध्ये देशी आणि विदेशी मद्याचा समावेश आहे.

दिल्ली उत्पादन शुल्क (दुरुस्ती) नियम, 2021 मध्ये बदल करण्यात आल्यानंतर मोबाइल अ‍ॅप्स किंवा ऑनलाइन वेब पोर्टलचा वापर करून ऑनलाइन ऑर्डरद्वारे दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली जाईल.

याआधीच्या नियमानुसार, दिल्लीत फक्त एल-१३ परवाना असणाऱ्यांनाच डिलिव्हरीसाठी परवानगी होती. ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे ऑर्डर मिळाली असेल तरच निवासस्थानावर डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मोबाइलवरुन ऑर्डर घेण्यास मात्र मनाई होती.

मात्र आता नव्या नियमानुसार, मोबाइल अ‍ॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ दिल्लीतील सर्व मद्याच्या दुकानांना डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त एल-१४ परवाना असणाऱ्यांनाच ही परवानगी आहे.

लॉकडाउन जाहीर झाल्यानंततर दिल्लीत मद्याच्या दुकानांबाहेर भली मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं होतं. यामुळे करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत होती. सुप्रीम कोर्टाने यानंतर मद्याची होम डिलिव्हरी करण्यासंबंधी विचार करण्याचा सल्ला दिला होता. यावेळीही एप्रिल महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दिल्लीत मद्याच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचं चित्र दिसलं होतं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: