नाशिक

नाशिकमध्ये लॉकडाऊनचा फियास्को 

नाशिक (अभयकुमार देशमुख)  :
कोरोना संक्रमण कमी असणाऱ्या जिल्ह्यात लॉकडॉउन शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नाशिक शहराचाही समावेश आहे. मात्र लॉकडॉउन शिथील केल्यानंतर शहरात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे.

लॉकडॉउन शिथील केल्यानंतर नाशिकच्या बाजारपेठा गर्दीने तुडंब भरल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये सोशल डिस्टनचा फज्जा उडाला असून जणू काय कोरोना निघून गेल्यासारखेच नाशिककर रस्त्यावर आले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रीत झाला आहे. अशा जिल्ह्यात लॉकडॉउनचे नियम शिथील केले आहेत. पण आता या निर्णयानंतर पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची भिती नाकारता येत नाही.
त्यामुळे नाशिक प्रशासनाने वेळीच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशी चर्चा नाशिक शहरात सुरु झाली आहे.
Nashik
Share

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: