गोवा 

डिचोलीत उद्यापासून पाच दिवस लॉकडाऊन

डिचोलीः
बुधवार ५ ते रविवार ९ मे पर्यंत डिचोलीतील (bicholim) सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली. बुधवार हा डिचोली बाजाराचा दिवस असून एकही दुकान, भाजीपाला व इतर कोणताही व्यवहार खुला नसेल. तसंच रविवारपर्यंत हा पूर्ण लॉकडाऊन असेल, असं पाटणेकरांनी सांगितलंय.
फार्मासी, पेट्रोल पंप व हॉस्पिटल्स या अत्यावश्यक सेवा सुरू असतील. बाकी सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं पाटणेकरांनी सांगितलं. पालिका मंडळ, पोलीस, मामलेदार तसंच डिचोली व्यापारी संघटना यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला असल्यानं त्याला सर्व घटकांनी सहकार्य करावं, असं आवाहन पाटणेकर यांनी केल.
bicholimमंगळवारी संध्याकाळी ४ वाजता पालिकेतील कर्मचारी, सभापती, तसंच नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह सर्व नगरसेवक बाजारात फिरून डिचोलीवासीयांना या लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं आवाहन करणार असल्याचंही पाटणेकरांनी सांगितसं.
डिचोली परिसरात एक हजाराहून अधिक कोविड रुग्ण संख्या असून परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण खुले आम फिरत असल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हा पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आसा असून सर्वांनी याला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश पाटणेकर तसंच कुंदन फळारी यांनी केलं आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: