मुंबई 

‘लोढा पलावा’मध्ये ‘आरोग्य जागर’

कल्याण (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता व्हावी यासाठी कल्याण मनपातील विभाग क्र. १२१ व १२२ मध्ये काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी शामराव यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय आरोग्य जागर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शुक्रवार, २४ ऑक्टोबर ते रविवार २५ ऑक्टोबर या दरम्यान बी शामराव यांच्या लोढा पलवा येथील संपर्क कार्यालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती देत आणि मोफत नोंदणी करण्यात ​आली. ​ ​त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना पंतप्रधान जनधन बँक खाते सुद्धा मोफत सुरू करून देण्यात ​आले. ​

लोढा हेवन पलावा येथे शहरातील सर्वाधिक घनदाट वस्ती आहे. शहरातील आणि मुंबईतून तसेच गाव खेड्यांतून येथे येऊन राहिलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये या जनतेचे मोठे हाल झाले. त्यावेळी आम्ही पक्ष आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जनतेला दिलासा दिला आहे. मात्र आता भविष्यात अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये आणि आरोग्याबद्दलच्या सरकारी योजनांचा त्यांना सहज लाभ मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सरचिटणीस बी शामराव यांनी सांगितले.

या शिबिराला शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, एकनाथ म्हात्रे, अजय पोळकर, शिबू शेख, चंद्रकांत पाटील, जॉय, बिजू राजन, गिरिधर पाटील, अशोक कापडणे आणि अँथोनि यांचही सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.​
​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: