गोवा 

नाईक हल्लाप्रकरणी हल्लेखोरांविरोधात ‘लुकआऊट’

पणजी :
३ जुलै रोजी झालेल्या आरटीआय कार्यकर्ते​ ​नारायण नाईक हल्लाप्रकरणातील हल्लेखोरांचा शोध एक आठवडा झाला तरी अजून लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्य संशयित आरोपीनं आपला गुन्हा कबूलही केला आहे. मात्र हल्लेखोर अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळे पोलिसांनी आा दोघा संशयित हल्लेखोरांविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

 

इस्माईल शेख आणि खलील फकिर या दोघा संशयितांविरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. इस्माईल शेख याचं वय ३२ वर्ष असून खलीलचं वय २४ वर्ष असल्याचं कळतंय. या दोघांच्या राहण्याचं ठिकाणही पोलिसांनी लुक आऊट नोटीसमध्ये नमूद केलंय. या दोघांचाही पोलीस शोध घेत आहेत. वेर्णा पोलिसांनी या दोघांच्या शोधार्थ लुक आऊट नोटीस जारी केलीये.

 

राज्यातील आरटीआय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ल्यात ३ जुलै रोजी भर पडली होती. ३ जुलैला नारायण नाईक हल्लाप्रकरणी हल्ला करण्यात आला होता. दोघांनी येऊन लोखंडी रॉडने नारायण नाईक यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनीही तत्काळ तपासाची सूत्र हलवत मुख्य संशयित आरोपीला ताब्यात घेतलं होतं. मुख्य संशयित आरोपी करीया यानं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. मात्र अजूनही या हल्ल्याप्रकरणावरुन अनेक सवाल उपस्थित केले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता ज्यांनी हल्ला केला, त्यांचा शोध लवकर लागावा यासाठी पोलिसांना लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: