गोवा 

‘पायाभूत सुविधा निर्माण करण्यास माझे प्राधान्य’

मडगाव :
शहराचा विकास होण्यासाठी अखंडीत पाणी पुरवठा, वीज पुरवठा, गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, रस्ते  अशा पायाभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मडगाव शहरात अशा सुविधा तयार करण्यावरच मी जास्त भर दिला आहे असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले.

मोंती डोंगर येथे ५०० क्युबीक मिटरच्या नवीन पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी स्थानिक नगरसेवक दामोदर वरक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता प्रेस्ली डायस, कार्यकारी अभियंता श्रीकांत गांवकर, सहाय्यक अभियंता सुबोध शिरोडकर, कनिष्ठ अभियंता पल्लवी तुपारे व नदिम यावेळी हजर होते.

जायका अंतर्गत सुमारे ७० लाख खर्चुन या टाकीचे बांधकाम करण्यात आले असुन, मोंती डोंगर परिसरातील रहिवाशाना अखंडीत पाणीपुरवठा करण्यात याची मदत होणार आहे. तीन वर्षात या टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिगंबर कामत यांनी दिली.

आज मडगाव शहरातील बहुतेक भागात भुयांरी गटार जोडणी झालेली आहे. शहरातील भूमीगत वीज वाहिन्यांचे काम मी पुर्ण करुन घेतले. घोगळ व मोंती डोंगर येथे मोठे जलाशय तयार बांधण्यात आल्याने आज साळावलीचा पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यास मडगावकरांना चार ते पाच दिवस पाणी पुरवठा चालुच राहतो असे दिगंबर कामत म्हणाले.

मडगाव शहराच्या सौंदर्यीकरणाचे काम मी आता चालिस लावले असुन, टप्प्या टप्प्याने ते काम पुर्ण करण्यात येणार आहे. मडगावच्या विकासासाठी आपले सहकार्य देणाऱ्या मडगावकरांचा मी नेहमीच ऋणी असेन असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: