सातारा 

टँकरने पाणी पुरवठा; सामाजिक दुराव्याचा  फज्जा

सातारा (महेश पवार) :  
तौक्ते वादळात महाबळेश्वर येथील महावितरणची बत्ती गेले तीन दिवस झाले गुल झाली, यामुळे महाबळेश्वर येथील पाणी पुरवठा योजना बंद झाली आहे. गेले दोन दिवस महाबळेश्वरमध्ये लोक पाणी-पाणी करु लागल्याने महाबळेश्वरला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला.

दरम्यान, टँकरने पाणी पुरवठा करताना पालिकेने  कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने पाणी पुरवठा करतेवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. आणि सामाजिक दुराव्याचा फज्जा उडाला. ऐन कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने येथील कोरोना रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  नगरपालिका प्रशासनाने माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने  कोरोना काळात नागरिकांच्या जिवाशी असा खेळ मांडल्याने नागरीकातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

mahabalewshar

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: