सातारा 

महाबळेश्वर : १८ ठिकाणी रस्ता खचला, ९ ठिकाणी दरड कोसळली

पाचगणी (प्रतिनिधी) :
महाबळेश्वर तालुक्यात पाऊसाचा जोर वाढला असून, पावसाच्या जोरदार तडाख्याने महाबळेश्वर तालुक्यात रस्ते, दरडी कोसळुन सर्वसामान्य भीतीच्यी छायेखाली जगत आहेत. महाबळेश्वर तालुक्यांतील चार मंडलनिहाय आजपर्यंत पाऊसाची नोंद ३८७८.१८ एमएम एवढी नोंद असल्याची माहिती महाबळेश्वर तहसिल कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर पावसाचा तडाखा बसलेल्या महाबळेश्वर तालुक्याला एकजण मृत्यु झाला असल्याची नोंद झाली आहे. पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यांतील बटाटा, नाचणी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाबळेश्वर तालुक्याला पाऊसाचा जोरदार फटका बसला असून तालुक्यांतील वाघोरी सातारा रस्ता, तापोळा महाबळेश्वर रस्ता, तापोळा वानवली ते आटेगाव रस्ता , पाली ते वेळापुर रस्ता, कोट्रुशी ते तापोळा, माचुतर रस्ता, शासकीय विश्रामगृह, गोरांबे येथील रस्ता खचला, शिवकालीन खेडे येथे रस्ता खचला, घोणसपुर रस्ता खचला, रुळे ते गावडोशी रस्ता खचला, आहीर ते आवळण रस्ता खचला असल्याची नोंद महाबळेश्नर तहसिल कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यांतील ९ जागी दरड कोसळली असल्याने तालुक्यांत यामुळे नुकसान झाले आहे. तालुक्यांतील प्रामुख्याने धावरी येथे डोंगर खचला आहे .बिरवाडी , कासरुड , चतुरबेट , गोरुशी , येथे दरड कोसळली असुन चतुरबेट येथे वाहतुकीचा पुल वाहुन गेला आहे . महाबळेश्वर तालुक्यांतील २३ घरांचे नुकसान अति पाऊसाने झाले आहे . महाबळेश्वर तालुक्यांतील १०० टक्के नुकसान पाऊसामुळे भात व नाचणी पिकाचे झाले आहे .तर भिलार परीसरातील १०० टक्के नुकसान बटाटा पिकाचे झाले आहेत .

कादाटी खोऱ्याचा पावसाने संपर्क तुटला असून, रस्ता ठिकठिकाणी खचला असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत कोणतीच उपाययोजना करता येणार नसल्याची माहिती महसुल विभागाकडून देण्यात आली आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: