महाराष्ट्र

‘चार टप्प्यात शिथिल होणार लॉकडाऊन’

मुंबई :
महाराष्ट्रात सुरु असलेला लॉकडाऊन १ जून रोजी संपणार असून, कोरोनाच्या दुसरी लाटेला अटकाव घालण्यात ठाकरे सरकारला पुरेशा प्रमाणात यश आल्याचे दिसत आहे. त्यामुळे १ जून पासून आता राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे.

​माहितीनुसार, सरकारकडून लॉकडाउन उठवण्याची तयारी सुरु झाली असून ३० जूनपर्यंत ​टप्याटप्प्याने निर्बंध शिथील ​होतील. पण याची सुरुवात नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत ​ठोस स्पष्टता नाही. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथीलता दिली जाऊ शकते.

पहिला टप्पा – दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल.
दुसरा टप्पा – दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल,.
तिसरा टप्पा – हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल.
चौथा टप्पा – मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.​​

तज्ज्ञांनुसार, ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अनलॉक करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे. पण जर रुग्णसंख्या वाढू लागली आणि हव्या तितक्या प्रमाणात लसीकरण झालं नसेल तर पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे​. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: