महाराष्ट्र

‘या’ ठिकाणी पहा तुमचा दहावीचा निकाल

मुंबई :
राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 100 टक्के, मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे.  इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली. सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. 10 वी ) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सन 2021 मध्ये इ.10वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: