सातारा 

​फलटण कोविड सेंटरमध्ये अवतरला ‘माणसातला देव’

फलटण ​(महेश पवार) :​
तालुक्यातील दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहेत,फलटण तालुक्यातील रुग्णांना कोठेही बेड उपलब्ध होत नाहीत​. अशावेळी गेल्या काही दिवसांपूर्वी अॉक्सिजन बेड मिळत नसल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या तालुक्यातील व मतदारसंघातील रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी  स्वत​:​ कोविड सेंटर सुरू केले​. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल उत्कर्ष येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या प्रयत्नातून लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर हे कोविड सेंटर सुरू केले. आता या कोविड सेंटरमध्ये फलटण नगरपरिषदेचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी आपला ठिय्या चक्क कोविड सेंटर मध्येच ठोकला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ​​फलटण नगरपरिषदचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा हे स्वत​:​ मधुमेह व हृदयविकार रुग्ण आहेत.मात्र स्वत​:​च्या जिवाची व आपल्या कुटुंबातील लोकांची परवा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणारा ​जात अनुप शहा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर कोविड सेंटर मधील काही रुग्णांनी सांगितले की आमची दररोज देखभाल करणा​रे अनुप शहा म्हणजे देव​माणूसचा आहे.
anup shahअनुप शहा यानां या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर या नात्याने त्यांना खंबीरपणे लाखमोलाची साथ डॉ.मोहित म्हात्रे ​यांची लाभली आहे.  आपण समाजाचे देणेकरी आहोत या भावनेतून ते मुंबई (डोंबिवली) येथून लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कोविड सेंटर मध्ये लोकांना उपचार देत आहेत.
नगरसेवक अनुप शहा व डॉ.मोहित म्हात्रे हे आपल्याकडे असलेल्या कोविडबाधित रुग्णांना आपल्याला कोविड झाला आहे परंतु आपण यावरती मात करायची आहे असे सकारात्मरित्या सांगतात आणि त्यांचे मनोबल वाढण्यासाठी दररोज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १५ मिनिटे योगा व त्यानंतर भजन, प्रवचन असे वेगवेगळे कार्यक्रम घेतात. नुकताच त्यांनी भजनासाठी पं.पू.पप्पूशामराजदादा जामोदेकर तर यांनी पं.पू.गोविंदराजदादा लांडगे यांचे प्रवचन आयोजित केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: