गोवा 

मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सचे ५ रोजी उद्घाटन

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती 

पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​) :​
मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स एकोनोमिक्स व मेनेजमेंट या विद्यालयाचे विधिवत उद्घाटन गुरुवार​, ५ रोजी सायंकाळी ५ वाजता मांद्रे येथे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे . यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत , मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे ,गोवा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू वरून सहानी,​ ​मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर , मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर​, ​वकील सुरेंद्र सरदेसाई​,​ वास्तुशिल्पकार नंदन सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार अशी माहिती मांद्रे विकास परिषद चेरमेन रमाकांत खलप यांनी २ रोजी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार ​परिषदेत  दिली .

रमाकांत खलप यांनी बोलताना मांद्रे विकास परिषद हि शैक्षणिक संस्था मागची चाळीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात आहे . शिक्षणदानाची कार्य करत असताना पूर्व प्राथमिक , प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा निर्माण केल्या​. पूर्वी न्यू इंग्लिश हायस्कूल वारखंड, त्यानंतर मांद्रे न्यू इंग्लिश स्कूल त्याचे त्यानंतर नामकरण केले . त्यानंतर सप्तेश्वर उच्च माध्यमिक इन्स्टिट्यूट त्यानंतर महात्वाकांशी योजना म्हणजे मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स  १० वर्षापूर्वी स्थापना झाली​. २०११ साली ईव्वीस परवानगी त्यानंतर बीकॉम गोवा सरकारने परवानगी दिली . २०१२ पासून पहिली बेच सुरु झाली आणि २०१३ , १४ व २०१५ पहिली बेच पास झाली  त्यानंतर पुढील बेच पास होवून गेली .या सर्व बेच च्या विधार्थ्यानी उत्कृष्ट निकाल लावला , डिग्री घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात ते चमकत ​असल्याचे सांगण्यात आले. ​

संस्थेला ग्रहण
खलप म्हणाले या शैक्षणिक संस्थेला मध्यंतरी काळात ग्रहण लागले राजकारण घुसवून संस्था बंद करण्याचा  प्रयत्न झाला. त्याविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले. न्यायालयातील खटले संस्था जिंकली आणि ​विद्यार्थी शिक्षण आणि संस्थेचा विजय झाला असे सांगितले . या निकालाने मनोबल वाढलेले आहे ,आता या पुढे हि संस्था भरारी घेणार आणि बीकॉम च्या बरोबरीने आता कला शाखेचा अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी मागितलेली आहे .

या वेळी कॉलेजसाठी  ज्यांनी योगदान दिले त्याचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार होणार आहे असे खलप यांनी सांगितले .

या पत्रकार ​परिषदेला डॉक्टर प्रतीक्षा खलप , नारायण नाईक , मुख्याध्यापक मोहनदास चोडणकर , प्रा. सुमेक्षा गावकर व प्रा. अरुण नाईक उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: