गोवा देश-विदेश

आता होणार कॅन्सरवर अचूक उपचार 

'मणिपाल' मध्ये आली देशातील पहिलीच सिंक्रोनी तंत्रज्ञान रॅडिक्सॅक्ट सिस्टम 

पणजी :

मणिपाल हॉस्पिटल्स या भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल्सच्या शृंखले ने भारतात प्रथमच  अत्याधुनिक अशा सिक्रोनी ऑटोमॅटिक  सह  रॅडिक्सॅक्ट सिस्टम ची सुरूवात केली असून यामध्ये असलेल्या रिअल टाईम मोशन सिंक्रोनायझेशन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरच्या रूग्णांवर अचूक उपचार करणे शक्य होणार आहे.  मणिपाल हॉस्पिटल्स ने सिंक्रोमी ट्युमर ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी ने युक्त अशा रॅडिक्सॅक्ट एक्स ९ थोमोथेरपी साठी आवश्यक परवाने हे एईआरबी कडून मिळवले असून अशा प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हे भारतातील पहिले मशीन ठरले आहे.  भारत हा आता रॅडिक्सॅक्ट सिस्टम सुरू करणारा यूएस, यूके, जपान आणि हाँगकाँग नंतरचा पहिला विकसनशील देश ठरला आहे.

रॅडिक्सॅक्ट सिस्टम मध्ये टोमाग्राफीची नवी पिढी असून त्यामध्ये सिंक्रोनी तंत्रज्ञान असल्याने त्याचा उपयोग हा कॅन्सर रूग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होतो.  विशेष करून डोके आणि मान, स्तन, जीआय आणि प्रोस्टेट कॅन्सर मध्ये होतो. यामुळे ८५ टक्क्यांपर्यंत अचूक उपचार करणे शक्य होते.  या सिस्टम  मुळे ३६० अंशातील रोटेशनल डिलिव्हरी मिळून संपूर्ण शरीर आणि सीटी वर आधारीत ट्रिटमेंट मिळून आयटरेटिव्ह रिकन्स्ट्रक्शन करणे शक्य होते.  दोन्ही तंत्रज्ञान एकत्रित असल्यामुळे रेडिएशन उपचार विविध पध्दतींचा अवलंब  करून करणे शक्य होते.  म्हणजेच इमेज गायडेड इन्टेन्सिटी-मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी (आयजी-आयएमआरटी) आणि स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरपी (एसबीआरटी) चा उपयोग करून अगदी कोणत्याही ट्युमर वर उपचार करता येतात, जरी रूग्णाचा श्वास सुरू असल्याने तो हलला तरीही अगदी अचूक आणि अतिशय बेजोड लवचिकता प्राप्त होते.

मणिपाल हॉस्पिटल्स ओल्ड एअरपोर्ट रोड येथील रेडिओथेरपी चे एचओडी आणि कन्सल्टंट डॉ. वरदराजा बी एम यांनी सांगितले “ उपचार आणि काळजी घेत असतांना मणिपाल हॉस्पिटल्स कडून नेहमीच रुग्णांसाठी  जगभरांतील सर्वोत्कृष्ट गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात.  सिंक्रोनी तंत्रज्ञाना मुळे कॅन्सरवरील उपचारांमध्ये क्रांती होऊन कॅन्सरच्या रूग्णांना कमी त्रास होईल.‍ रॅडिक्सॅक्ट सिस्टम च्या सिंक्रोमी मुळे उपचारकर्त्यांना नवीन तंत्रज्ञानामुळे अतिशय कार्यक्षमतेने रेडिएशन थेरपीची गरज असलेल्या कॅन्सर रूग्णांना मदत होणार असून श्वास घेतांना हलणार्‍या ट्युमरवरही यामुळे उपचार करणे शक्य होईल.”

मणिपाल हॉस्पिटल बंगलोरच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाने ॲक्युरेजच्या सिंक्रोनी मोशन ट्रॅकिंग ॲन्ड करेक्शन ने युक्त रॅडिक्सॅक्ट सिस्टमचा उपयोग करून पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार  केले आहेत.  ५१ वर्षीय महिलेवर हे उपचार करण्यात आले असून या महिलेच्या फुप्फुसामध्ये एक मेटॅस्टॅटिक ट्युमर सह रिनल सेल कार्सिनोमा ही होता.  एचओडी आणि कन्सल्टंट  रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट  डॉ. वधिराजा बीएम  यांनी हे नमूद केले की  रॅडिक्सॅक्ट ९ सिस्टम मधील ‍सिंक्रोनॉमी तंत्रज्ञानामुळे फुफ्फुसातील ट्युमर रिअल टाईम पध्दतीने शोधता आला,  कारण रूग्णाच्या  नैसर्गिक श्वसनामुळे तो सतत हलत होता आणि त्याच बरोबर रेडिएशनचे किरण  हे या हलत्या ट्युमर वर अचूकपणे टाकणे शक्य झाले. या तंत्रज्ञानामुळे  ट्युमरच्या जवळपासच्या चांगल्या पेशींचा बचाव झाला , जेणे करून रेडिएशनचा डोस हा फुप्फुसातील आसपासच्या चांगल्या पेशींवर कमी होऊन कॅन्सर पेशींना नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेला अधिक डोस  देणे शक्य झाले.

रॅडिक्सॅक्ट ९ तंत्रज्ञानातील सिंक्रोनी तंत्रज्ञानाचे लाभ –
१.श्वासाबरोबर हलणार्‍या कॅन्सर सारख्या म्हणजेच फुप्फुसे (प्रायमरी किंवा मेटॅस्टॅटिक ), यकृत , स्वादुपिंड, आतडी, आणि प्रोस्टेट्स यांच्याती कॅन्सर चा ट्युमर शोधणे आणि उपचार करणे सोपे जाते.
२.  सध्याच्या रेडिएशन तंत्रज्ञाना मध्ये एकूण उपचारांसाठी लागणार्‍या वेळेच्या  तुलनेत या उपचार पध्दती मध्ये  खूपच कमी वेळ लागतो. परिणामी वेळेची बचत होते.
३.  रूग्ण नैसर्गिक रित्या श्वसन करत असतांना हलणार्‍या कॅन्सर वर इलाज हे सोप्या आणि आरामदायक पध्दतीने करणे शक्य होते.

सिंक्रोनाईज तंत्रज्ञान हे आपल्या आधीच्या पिढीच्या तुलनेत वेगळे असते,  यामुळे रुग्णालयात  काम करणार्‍या डॉक्टरांच्या टिमला रेडिएशन अतिशय अचूक पध्दतीने देणे शक्य करते.  कारण यावेळी  ट्युमरच्या आसपासच्या चांगल्या पेशींना होणारे नुकसान यामुळे कमी होते,  ज्यामुळे रूग्णाला कमीत कमी त्रास होतो आणि रूग्ण किमान रेडिएशनच्या संपर्कात येतो.  जेंव्हा रुग्ण श्वास घेऊ लागतो त्यावेळी ट्युमरही हलू लागतो,  ही गोष्ट हाय रेडिएशन देते वेळी खूपच घातक ठरू शकते.  पण सिंक्रोनी ट्युमर ला शोधून काढतो, ट्युमर चा लगेच शोध लावून अगदी ०.३  सेकंदाच्या आत आपली स्वत:ची स्थिती ठीक करून रूग्णाला कमीत कमी जखम तसेच अगदी कमी त्रासात अचूक डोस देऊन बरा करतो.  रेडिॲक्ट सिंक्रोनी मुख्यत्वे करून मल्टी सेंट्रिक ब्रेन ट्युमर, मल्टीपल मेआस्टेसिस, लिव्हर मेटास्टेसिस, लंग मेटास्टेसिस आणि स्टिरिओटॅक्टिक थेरपी यांसारख्या थेरपीत उपयुक्त आहे.

मणिपाल हॉस्पिटल्स कडून सातत्याने तंत्रज्ञानातील अधुनिकता आणत कॅन्सरच्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्कृष्ट उपचार देण्यावर भर दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: