क्रीडा-अर्थमत

कोलंबिया एशिया हॉस्पिटल्सवर आता ‘मणिपाल’चा शिक्का

​बंगळूरू :
मणिपाल (Manipal) हॉस्पिटल्सने आज त्यांनी कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (कोलंबिया एशिया) चा १०० टक्के हिस्सा अधिग्रहीत केल्याची घोषणा केली. मालकीच्या हस्तांतराची प्रक्रिया ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर पूर्ण करण्यात आली आहे. या अधिग्रहणामुळे मणिपाल हॉस्पिटल्स आता भारतातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल्सची शृंखला बनली आहे. आज, या एकत्रित झालेल्या संस्थेकडून आता मणिपाल हॉस्पिटल्स च्या कौशल्य आणि सेवांबरोबरच कोलंबिया एशियाच्या गुणवत्तापूर्ण क्लिनिकल आणि सेवा प्राप्त होणार असून त्यामुळे देशभरांतील लोकांना गुणवत्तापूर्ण विशेष वैद्यकीय सेवा संपूर्ण देशभरांत उपलब्ध होणार आहेत.
या व्यवहाराची पूर्तता केल्याची घोषणा करतांना मणिपाल एज्युकेशन ॲन्ड मेडिकल ग्रुप (एमईएमजी) चे चेअरमन डॉ. रंजन पै यांनी सांगितले “ आम्ही आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता आरोग्य सेवा देणार्‍या दोन संस्था एकत्र आल्याचा आंम्हाला आनंद आहे. एकत्रिकरणामुळे आता दोघांच्या सर्वोत्कृष्ट पध्दती एकत्र आल्या असून आमच्या रूग्णांना जागतिक स्तरावरील सुविधा उपलब्ध होऊ शकतील. मी पुन्हा एकदा कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स च्या संपूर्ण चमूचे मणिपाल परिवारात स्वागत करतो.”
या अधिग्रहणामुळे मणिपाल हॉस्पिटल्सला आता मोठ्या प्रमाणावर भौगोलिक विस्तार करण्याबरोबरच ज्या संस्कृतीत कोलंबिया एशिया रूजली आहे त्या ठिकाणी वाढण्याची संधी मिळाली आहे. एकत्रित बनलेल्या अशा या संस्थेचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर वाढले असून ते म्हणजे १४ शहरांत ७००० हून अधिक खाटा, ४ हजारांहून अधिक कुशल डॉक्टर्स आणि १० हजारांहून अधिक कर्मचारी बनले आहेत. शृंखले कडून वर्षाला ४ दशलक्ष रूग्णांवर उपचार होत असल्याने हॉस्पिटलची ही शृंखला आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी आरोग्य सेवा प्रदाता शृंखला ठरली आहे.
Manipalहा व्यवहार पूर्ण झाल्याविषयी आपले मत व्यक्त करतांना कोलंबिया पॅसिफिक मॅनेजमेंट चे चेअरमन डॅन बॅटी यांनी सांगितले “ मणिपाल आणि कोलंबिया एशिया यांचे मिश्रण पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. कारण यामुळे अधिक रुग्णांना क्लिनिकल सेवांमधील कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकेल.” कोलंबिया एशिया हॉस्पिटल्स ने भारतात आपले काम २००५ मध्ये बंगळूरू येथील हेब्बळ येथे सुरू केले आणि त्यानंतर बंगलोर, मैसूर, गुरूग्राम, गाझियाबाद, पतियाळा आणि पुणे अशा ११ हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन केले, त्यांच्या कडे १३०० हून अधिक खाटा, १२०० हून अधिक क्लिनिशिअन्स आणि ४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: