गोवा 

…आणि २४ तासांत ९८ वर्षांच्या आजी चालत आल्या घरी

​पणजी :

गंभीर स्वरुपाचा गुडघ्यांचा ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या ९८ वर्षीय महिलेवर गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना १० जून २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि एमआयएस तंत्राचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना २४ तासांच्या आता डिस्चार्ज देण्यात आला.

मणिपाल हॉस्पिटलमधील सल्लागार – हिप आणि गुडघे प्रत्यारोपण सर्जन डॉ. रोहन देसाई म्हणाले, “रुग्णाने दोन वर्षांपूर्वी आमच्याशी संपर्क साधला होता तेव्हा त्यांच्या डाव्या गुडघ्यामध्ये समस्या होती. त्या वेळी त्या समस्येला नियंत्रणात आणले होते आणि शस्त्रक्रिया करण्याची गरज नव्हती. दोन वर्षांपूर्वी या रुग्ण आमच्याकडे पुन्हा एकदा आल्या आणि त्यांची तपासणी केल्यावर दिसून आले की, त्यांच्या गुडघ्याचा गंभीर स्वरुपाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे त्यांना उभे राहता येत नव्हते किंवा चालता येत नव्हते आणि त्यांना व्हीलचेअरवर बसून राहावे लागत होते. आम्ही आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या आणि त्यांचे समुपदेशन केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांना आधीपासून हायपरटेन्शन, हृदयविकार हे आजार होते, त्यांच्या शरीरात गेली १५ वर्षे पेसमेकर होता, त्यांना नेफ्रोपथी आणि अॅनिमिया होता. शस्त्रक्रियेच्या आधी आणि दरम्यान हे सर्व आजार व्यवस्थितपणे हाताळण्यात आले. आम्ही किमान छेद देत संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रियेच्या काही तासांमध्ये रुग्णाला उभे राहता येत होते आणि चालताही येत होते. त्यांची हालचाल पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटले. गोव्यामध्ये प्रथमच ९८ वर्षे वय असलेल्या आणि सहआजार असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली.”
गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलचे हॉस्पिटल संचालक मनीष त्रिवेदी म्हणाले, “व्यक्तींचे वय ६० किंवा ७० झाले की, त्यांचा शस्त्रक्रिया टाळण्याकडे कल असतो. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. फक्त त्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. या प्रकरणातील रुग्णाचे वय ९८ होते. त्याचप्रमाणे त्यांना अनेक सहआजारही होते. शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या दिवसभरात त्या उभ्या राहू शकत होत्या आणि चालू शकत होत्या. मल्टिमोडल अॅनाल्जेशिया आणि भूल देण्याच्या तंत्रात प्रगती झाल्यामुळे हे शक्य झाले. ही सुविधा गोव्यात केवळ मणिपाल हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे.​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: