गोवा 

‘मनोहर पर्रीकर यांच्या वारशाला पुन्हा तडे गेले’

दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांची टीका

मडगाव :
आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या कोसळलेल्या दर्शनी काचा व गोमेकॉच्या सुपरस्पेशलीटी ब्लॉकमध्ये आलेल्या पावसाळी पाण्याने स्व. मनोहर पर्रिकरांच्या वारशाला पुन्हा तडे गेले आहेत, अशी बोचरी टिका दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी केली आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम व गोमेकॉचा सुपरस्पेशलटी ब्लॉक येथे कोविड रुग्णांना दाखल करुन घेतलेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा प्रशासनावरील ताबा पुर्णपणे गेला आहे हे आता उघड आहे. त्यामुळे मुख्यसचिव परिमल राय यांनी त्वरित झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ताबडतोब दुरूस्ती काम हातात घेणे गरजेचे आहे. कोविड रुग्णांचे हाल होणार नाहीत याची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली आहे.

सरकारने घाईघाईत कामाचा दर्जा न सांभाळताच केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी सदर स्टेडियमचे काम पुर्ण करुन घेतले व लोकांनी कष्ट करुन भरलेल्या करांच्या पैशांची उढळपट्टी केली. गोमेकॉच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकात पाणी कसे शिरले याची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली आहे.

goaस्व. मनोहर पर्रिकरांनीच सुरू केलेल्या तिसऱ्या मांडवी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच “अटल सेतू” ला एका वर्षात तडे गेले व रस्त्यांवर खड्डे पडले. सदर पुल अजुनही पुर्णपणे वाहतुकीस खुला झालेला नाही हे महत्वाचे आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकरांचेच नाव दिलेल्या काणकोण-माशें बगल रस्त्याची अशीच हालत झाली असुन, त्या रस्त्याच्या बाजुला उभारलेल्या लोखंडी कड्याना गंज चढला आहे. कमिशन खाऊन कामाचा दर्जा खालावल्याचे हे अजुन एक उदाहरण आहे. फातोर्डा येथिल पंडित नेहरु स्टेडियमवर स्व. मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दुरूस्तीसाठी ६७ कोटी खर्च केले. परंतु, सदर स्टेडियमवरचे ३०० पत्रे पावसाच्या वाऱ्याने वाहुन गेले. कॉंग्रेस पक्षाने हा “मिशन तीस टक्के कमिशन” भ्रष्टाचार उघडकीस आणला होता याची आठवण जोसेफ डायस यांनी करुन दिली आहे.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सुमारे पंधरा दिवस आधी सरकारला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांची जाणिव करुन दिली होती व त्यामुळे कोविड व्यवस्थापनात बाधा येणार हे भाजप सरकारच्या लक्षात आणुन दिले होते. वीज पुरवठा खंडित होणे, रस्त्यांवर अडथळे तयार होणे, पूर येणे अशामुळे कोविड हाताळणीत बाधा पोचणार असे त्यांनी सरकारला स्पष्ट सांगितले होते. दुर्देवाने भाजप सरकारने सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले.

भाजपने आता उद्घाटने व उत्सव करण्याच्या वातावरणांतुन बाहेर यावे व लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. यापुढे पावासाचा जोर वाढणार असुन, उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सरकारने आताच तयारी करावी अशी मागणी जोसेफ डायस यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: