सातारा 

‘वाई’ मराठा समाजाचा संभाजीराजेंना पाठिंबा

सातारा (महेश पवार) :

मराठा क्रांती मोर्चा वाई तालुका यांच्या वतीने वाई प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली, या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा चे स्वयंसेवक उपस्थित होते . यावेळी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने वाई प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले​. 

या निवेदनात म्हटले आहे , गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन निवेदन मोर्चा आदी लोकशाही मार्गाने प्रयत्न केले आहेत , मात्र केलेल्या मागणीला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही .मराठा समाजातील अनेक तरुण , मुलं मुली पात्रता असूनही आरक्षणा अभावी नोकरीपासून वंचीत राहत आहेत , कोल्हापूर येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्या आंदोलनाला वाई तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला , मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्थ मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला ​. 
 
यावेळी यशराज भोसले , चरण गायकवाड ,काशिनाथ शेलार , प्रदीप कदम , किरण खामकर , गजानन भोसले , सचिन घाडगे , यांसह आदी मराठा समाजाचे स्वयंसेवक उपस्थित होते​. 
wai
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: