कला-साहित्य

‘मराठी असे आमुची मायबोली’तर्फे निबंध स्पर्धा

पेडणे (प्रतिनिधी)
मराठी असे आमुची मायबोली माशेल तर्फे अखिल गोमंतक मराठी निबंध (essay) स्पर्धा आयोजित केली आहे.  ‘मराठी राजभाषा न होण्यामागचा इतिहास व त्यावरील पुढील उपाय’ या विषयावर किमान १२०० शब्दात निबंध पाठवायचा आहे.

यासाठी प्रथम पुरस्कार रोख रुपये ५००० पाच हजार , दुसरे बक्षीस ३००० तिसरे १००० व तीन प्रत्येकी ५०० रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धा सर्व वयोगटातील लोकांसाठी खुली असून गोवा राज्यापुरती मर्यादित आहेत. निबंध पाठवण्यापूर्वी स्पर्धकांनी आपली नावनोंदणी करून नियमावली प्राप्त करावी असे कळवण्यातआले आहे.

निबंध पाठवण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२१ असेल. आपले लेख हे टंकलेखन करून ९८२२४८९१०५  या नंबरवर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संचालक प्रकाश भगत यांच्याकडे संपर्क साधावा. सहभागी स्पर्धकाना ई प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये अधिधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: