कला-साहित्यदेश-विदेश

कोण आहेत गुगल डुडलमधल्या ‘मार्गेरिटा हॅक’?

नवी दिल्ली :
गूगलने आज (12 जून) इटालियन खगोलशास्त्रज्ञ मार्गेरिटा हॅक (Margherita Hack) यांना आपलं डूडल समर्पित केले आहे. आजच्या अ‍ॅनिमेटेड डूडल वर त्यांनी 1995 साली शोधलेल्या asteroid 8558 Hack झळकत आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल या asteroid ला त्यांचेच नाव देण्यात आले होते.

हॅक यांचा जन्म 12 जून 1922 दिवशी फ्लॉरेन्स मध्ये झाला. University of Trieste मध्ये त्या Professor of Astronomy म्हणून काम करत होत्या. 1964- 1987 Trieste Astronomical Observatory चं प्रशासन सांभाळणार्‍या त्या पहिल्या इटालियन महिला होत्या.

Hack यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचा आणि रिसर्च अ‍ॅक्टिव्हिटीचा व्यासंग फार मोठा होता. तार्‍यांच्या नेत्रदीपक वैशिष्ट्यांबबात त्यांना विशेष रस होता. त्यामध्येच त्यांचे नैपुण्य देखील होते. या बाबतच्या अभ्यासामध्ये तार्‍यांच्या निर्मितीमधील केमिकल कम्पोझिशन, त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान आणि ग्रॅव्हिटी यांचा त्यांनी अभ्यास केला होता.

1970 मध्ये त्यांनी Copernicus satellite मधून युव्ही डाटा वर काम केले होते. त्यांचा पहिला रिसर्च Copernicus वर आधारित डाटा मधून 1974 साली Nature मध्ये प्रसिद्ध झाला होता. विज्ञानासोबतच त्या शिक्षण क्षेत्रामध्येही कार्यरत होत्या. राजकीय घडामोडींची देखील त्यांना आवड होती. 12 जून 2012 साली त्यांच्या 90 व्या वाढदिवसाला त्यांना “Dama di Gran Croce” या इटालियन रिपब्लिकच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Margherita Hack

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: