सातारा 

मेढा पोस्ट ऑफिसला शॉर्टसर्किटचा धोका

मेढा : 

जावली तालुक्या​चे मुख्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेढा शहरातील पोस्ट कार्यालयाची इमारत .​अतिवृष्टीमुळे पोस्ट कार्यालयात पाणी गळती​मुळे विद्युत उपकरणाना पाणी लागल्याने शॅार्ट सर्कीटचा धोका निर्माण झाला आहे. मेढा पोस्ट ॲाफिसमधील कर्मचारी जीव मुठीत घेवुन पाण्याच्या ओलाव्यात असुरक्षित काम करत असल्याच धोकादायक चित्र मेढा पोस्ट कार्यालयात ​पहायला मिळत आहे. मेढा पोस्ट​ ​कार्यालयात पासाचे पाण्याच्या गळतीमुळे पोस्टातील येणारी कागदपत्रे देखील असुरक्षित झाले असल्याचे बोलले जात आहे.

मेढा येथील पोस्ट कार्यालय गत १० वर्षापासुन मेढ्याच्या मुख्य​ चौकातील धनावडे मार्केटमध्ये कार्यरत आहे​. ​इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील पोस्ट कार्यालयात पा​वसाच्या पाण्याची गळती ​ठिकठिकाणी होत असून कार्यालयातील कर्मचार्याच्या टेबल व खुर्ची याच्यासह कार्यालयीन कम्प्युटर सुद्धा पाऊसाचा पाण्याच्या गळतीत भिजुन जात आहे . कर्मचारी कम्प्युटर व तत्सम वस्तु हाताळताना कर्मचार्याना शॅाक बसण्याचे प्रकार वाढले आहेत . मेढा पोस्ट ॲाफीसमध्ये येणारे सर्वसामान्य नागरीकांना सुद्धा शॅाक बसण्याचा अनुभव आला आहे .
मेढा पोस्ट​ ​कार्यालयाची जागा बदलण्याकरीता कार्यालयाच्या जिल्ह्यांच्या कार्यालयाकडून धोक्याची सुचना पाहता कार्यालय​ला ​जागा शोधण्याचे काम सुरु आहे​. मात्र त्याला अद्याप यश आले नाही . जावली तालुक्याच्या मेढा कार्यालयात जीव गेल्यावरच उपाययोजना होणार का ?​ ​असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरीक​ करत आहेत. 
मेढा पोस्ट कार्यालयातील पा​वसाची पाण्याची गळती धोक्याची सुचना ​देऊनही अद्याप कोणतीच उपाययोजना न झाल्याने सर्वसामान्य नागरीका​​मधुन नाराजी व्यक्त होत आहे . मेढा पोस्ट कार्यालयाचे जलतरण कार्यालय लवकरात लवकर बदलुन सर्वसामान्या​​सह कर्मचार्याच्या जीव वाचवावा अशी मागणी जावली तालुक्यातुन होवु लागली आहे​. 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: