कला-साहित्यमहाराष्ट्र
Trending

एक अनुकरणीय लग्नसोहळा…

– प्रतिनिधी

महात्मा फुलेंनी जसे त्या काळात हिंदू समाजासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्याचप्रमाणे आजच्या काळात मुस्लिम समाजासाठी तसेच कार्य करण्याचे गरज आहे आणि हे काम अस्लम जमादार आज अधिक प्रभावीपणे आपल्यापरीने करत आहेत, असे प्रतिपादन करत ज्येष्ठ विचारवंत प्रा. ग.प्र.प्रधान यांनी अस्लम यांना त्याचवेळी आपला नातू मानले होते. अस्लम जमादार यांनी नेहमीच आपल्या कामातून समाजात कुटूंब नियोजनाचा प्रचार, प्रसार, देहदान, नेत्रदान, अवयदान, अंधश्रध्देवर प्रहार, अनिष्ट प्रथा-परंपरावर गेली 30 वर्षे लेखणीच्या माध्यमातून हल्ला चढवत आहेत.​

याच अस्लम जमादार यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून आपल्या आजवरची उक्ती खरी करून दाखवत, समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी आपल्या उच्च विद्याविभूषित मुलाचे लग्न अवघ्या नवर्‍या मुलासह अवघ्या सात जणांमध्ये साजरे केले.
सध्याच्या कोरोना काळातील एकूण निर्बंध लक्षात घेतानाच त्यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्या काळात जसे अवघ्या काही जणांमध्ये साधेपणामध्ये लग्न होत असे, वायफळ खर्च टाळला जात असे, तीच धुरा अस्लम यांनी पुढे वाहिली आहे.

अस्लम यांनी अशापध्दतीने मुलाचे लग्न करतानाच या लग्नाला येऊ शकणारा साधारण सगळा खर्च अनाथ आश्रम, पुरोगामी विचारसरणीचे मदरसे आणि सामाजिक संस्था तसेच कोरोना महामारीविरोधात लढणार्‍या संस्थांना देत आदर्श ठेवला जातो. त्यांच्या या कृतीचे कौतुक लेखक व राज्याचे माजी पोलिस आयुक्त अब्दुल रहमान, राज्याचे प्रमुख कोरोना डॉक्टर प्रदीप आवटे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेरे, प्रा. शोभा चांदगुडे, निवृत्त पोलिस अधिकारी जान मोहम्मद पठाण, सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढमढेरे, साधनेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मनेर सर तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली येथील विविध मान्यवर आणि मित्रमंडळींनी अस्लम यांचे कौतुक तथा अभिनंदन केले.

सोलापूर येथील मौलाना अमजद अली काझी शाहेर काझी यांना हा लग्न विधी पार पाडला. यावेळी त्यांनी सांगितले, हा लग्नसोहळा ऐतिहासिक असून अशापध्दतीने समाजात लग्न करण्यासाठी लोक पुढे येत असल्याचा आनंद आहे. त्यांनी यावेळी दिलेल्या दुवामध्ये कोरोना महामारीसंदर्भात चिंता व्यक्त करतानाच समाजबांधवांनी सरकारला या कठिण काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे मदरसे तसेच समाजातील विविध घटकांनी कोरोना केअर सेंटर, आरोग्य सेवा पुरवणार्‍या संस्था, दवाखाने यांना आपल्यापरिने सेवा, आर्थिक सहकार्य करावे असेही सांगितले. त्याचप्रमाणे नवी पिढी संशोधन तथा देशसेवेसाठी जन्मणारी निर्माण होऊ दे असे अल्लाहकडे मागणे मागितले.

यावेळी सोलापूरचे माजी महापौर आरिफ शेख, माजी स्थायी समिती अध्यक्ष रियाझ हुंडेकरी, किरण पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक वारिस कुडले, नवयुग तरुण यांनी नवदाम्पत्यांस शुभाशिर्वाद दिले. हा लग्नसोहळा मोजक्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झाला असला तरी गुगल मीटच्या माध्यमातून भारतासह अमेरिका, इंग्लंड, कतार, जर्मनी, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया या आठ देशांतील मित्रपरिवार आणि आप्तस्वकिय उपस्थित होते.

google meet

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: