मुंबई 

उद्या होणार मेट्रो- ७ मार्गाची चाचणी

​मुंबई (प्रतिनिधी) :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणामार्फत उभारण्यात येत असलेल्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो 7 मार्गावर डहाणूकरवाडी आणि आरे मेट्रो स्टेशन दरम्यान सोमवारपासून (ता. 31) रेल्वेची चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या हस्ते या चाचणीचे उदघाटन करण्यात येणार आहे. या मार्गावर पुढील काही दिवस चाचणी सुरु राहणार असून ऑक्टोबर महिन्यात मेट्रोचा पहिला टप्पा सेवेत आणण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे.

 

एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेल्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गाच्या कामात कोरोनामुळे अडचणी येत आहेत. 2016 मध्ये या प्रकल्पांचे काम सुरु झाले होते. पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पुर्ण होणार होते. 2020 च्या अखेरीस हे प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येणार होते. मात्र कोरोनामुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळा आला. लॉकडाउनमुळे कामगार गावी गेल्याने प्रकल्प लांबला. यानंतर एमएमआरडीएने जानेवारी 2021 पासून मेट्रोची चाचणी घेऊन मार्चमध्ये हे दोन्ही मार्ग आणण्याची घोषणा केली होती. परंतु पुन्हा कोरोनामुळे या मार्गाचे काम लांबणीवर पडले आहे. हे काम अंतिम टप्यात पोचले आहे. चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर ऑफ इंडियाने ( सीईआयजी) ओव्हरहेड वायरची चाचणी पूर्ण केल्यानंतर केल्यानंतर रेल्वे चाचणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्याप्रमाणे सोमवारी मेट्रो 7 मार्गावरील डहाणूकरवाडी आणि आरे मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो रेल्वेची चाचणी सुरु होईल. या मार्गावरील उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गाची चाचणी होईल. या सोहळ्यासोबतच पश्चिम द्रुतगती महामार्गावर टर्मिनस एक आणि दोन जवळ भुयारी आणि उड्डाणपुलाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राजणोली उड्डाणपुलाच्या ठाणे कडे जाणाऱ्या मार्गिका ई सोहळ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खुली करण्यात येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: