गोवा 

…’म्हणून’ केले ‘मगोप’ने राष्ट्रीय महामार्गावर भजन 

पेडणे  (प्रतिनिधी) :

राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या रस्त्याच्या खड्ड्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीत मगो पक्ष  पेडणे मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रीय  महामार्गावर  भजन कार्यक्रम  करुन आणि खड्यात कवाथे लावून तसेच उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या पुतळ्याचे खड्ड्यात दहन करत सरकारचा व ​​उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा  निषेध केला.

पेडणे मतदारसंघातील महाखाजन ते ​पत्रादेवीपर्यंतचा  राष्ट्रीय महामार्गावर हा खड्डेमय बनल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या  रस्त्यावर आतापर्यंत अनेकांना अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले.माञ सरकारला रस्त्याचे बांधकाम करणारी एम.व्ही.आर कंपनी जुमानत नाही. याचा प्रत्यय पेडणेतील जनतेला आणि वाहनचालकांना आला आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे ​पावसामुळे सर्वत्र तलाव स्वरुपात झाले असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी दुपारी पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली पेडणे मतदारसंघातील मगो पक्षाच्यावतीने आगळा वेगळा भजन व आरती तसेच खड्ड्यात कवाथे लावून आणि पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचा प्रतिमेचे खड्ड्यात दहन करण्यात आले.

​​भजनासाठी खास तयार  केले बाबूचा निषेध करणारी अभंग रचना
यावेळी बाबू आजगावकर यांच्यावर अभंग रचना  करुन बाबू आजगावकर यांचा निषेध केला. यामध्ये बाबूचा गजर रस्त्यावर खड्डे पडले,  असे केले या बाबूने ,  पेडणेची वाट लावली, नोकर सेवक म्हणोनी ,  मोपा विमानतळ प्रकल्पावर बाहेरच्याना काम असे अभंग व आरती गाऊन सर्वांचे लक्ष वेधले.यावेळी या मार्गाने वाहतूक करणारी  वाहन चालक थांबून हे भजन ऐकत होते.


​​बाबू मिशन ३०% कमिशन
यावेळी आरतीने भजनाची सांगता करण्यात आली. बाबू ३०% कमिशन ही आरती यावेळी सादर करुन निषेध व्यक्त केला.​​रस्ते महाराजाला साकडे
यावेळी रस्ते महाराजा आज सरकारकडे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी पैसे नाही महाराज , आज आमचे बाल गोपाळ कामानिमित्ताने दरवर्षी आपल्या गाडीने कामाला जातात व परत येतात   त्यांना सुखरुप ठेव रे महाराजा आणि सरकारला रस्त्यावरचे खड्डे बुजवायला व रस्ता चांगला करायला   चांगली बुद्धी दे रे महाराज असे सागडे यावेळी घालण्या आले.

​​रस्त्यावर एमव्हीआर कंपनीने बाबूला दिलेली आॕडी गाडीच चालू शकतेः प्रवीण आर्लेकर
यावेळी पञकारांकडे बोलताना मगो नेते प्रवीण आर्लेकर म्हणाले , की पेडणेचे आमदार यता उपमुख्यमंञी बाबू आजगावाकर याला हे रस्त्यावरचे  खड्डे दिसत नाही.कारण रस्ता कंपनी एमव्हीआरने बाबू आजगावकर यांना कमिशन दिले.आणि गाडी दिली ति आॕडी गाडीचे या रस्त्यावर चालू शकते. लोकांच्या गाड्या या रस्त्यावर खराब होत  असून पेडणेकरांनी  निवडून दिलेल्या लोकांची  बाबू आजगावकर यांना पर्वा नसल्यामुळेच हे खड्डे  रस्त्यावर आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज हे भजन आंदोलन करावे लागले. मुख्यमंत्री डाॕ.प्रमोद सावंत यांनी या रस्त्याची पहाणी करुन हा रस्ता  दुरुस्ती करावा अशी मागणी आर्लेकर यांनी केली.

​​बाबू मानेला पट्टा घालतो म्हणून खड्डे दिसत नाहीतः नरेश कोरगावकर
यावेळी बोलताना मगो कार्यकर्ता नरेश कोरगावकर म्हणाले  उपमुख्यमंञी बाबूआजगावकर हे आपल्या  मानेला पट्टा घालून गाडीतून प्रवास करतात व ते वर बघतात म्हणून रस्त्यावरचे खड्डे त्यांना दिसत नाही. आज अनेकाचे प्राण या रस्त्यावर गेले.  नागरिक महागाई कोरोना आणि पुरामुळे ञस्त झाले आहेत ते आज रडत असताना भाजप अध्यक्ष यांचे स्वागत करण्यासाठी हे बाबू आजगावाकर व भाजपचे सर्व आमदार आणि मंञी  जातात व ढोल ताशे वाजवतात आणि  स्वागत करतात यावरून त्यांना गरीब जनतेचे काही पडले नसल्याचे नरेश कोरगावकर म्हणाले.

​​लोक मरतात आणि ढोल ताशे कसले वाजवतातः चंद्रशेखर खडपकर
यावेळी बोलताना माजी सरपंच चंद्रशेखर खडपकर म्हणाले की रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी भजन आंदेलन करावे लागते.या भागाचे आमदार आणि उपमुख्यमंञी बाबू आजगावाकर व सार्वजनिक बांधकाममंञी दीपक ढवळीकर हे या रस्त्याची पहाणी करुन एक महिन्यापूर्वी गेले.माञ ते खड्डे बुजवू शकले नाहीत. बाबू आजगावकर यांना लोकांनी  रस्ते , पाणी,  वीज ह्या मुलभूत सुविधा देण्यासाठी निवडून आणले माञ ते देण्यास अपयशी ठरले. त्यांनी कोणता विकास केला.हाच काय त्यांचा विकास. । रस्त्याचे नियोजन नसल्यामुळे कितीतरी बळी गेले. माञ सरकारला जाग येत नाही. भाजपचे  राष्ट्रीय  अध्यक्ष जीपे नड्डा गोव्यात येतात त्यासाठी हे मंञी धावून जातात. त्यांचे भव्य ढोल ताशे वाजून स्वागत करतात.लोक येथे मरत असताना कसले स्वागत करतात. लोकांनी कामे करण्यासाठी निवडून दिले आहेत ती कामे करा व ती केल्यास परत लोक निवडून देतील असे चंद्रशेखर म्हणाले.

​​पेडणे मतदारसंघाची दयनीय परिस्थिती ः सुबोध महाले

यावेळी बोलताना उगवे  -तांबोसे – मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले म्हणाले की पेडणे मतदारसंघाची दयनीय परिस्थिती झाली आहे.यामतदारसंघाचे आमदारबाबू आजगावकर यांचे लक्ष नसल्यामुळे नागरिकांच्या  समस्या सुटत नाहीत. आजमतदारसांघात वीज पाणी आणि रस्ते ह्या मुलभूत सोयी बाबू आजगावकर देऊ शकले नाही.राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना स्थानिक पंचायतीना विश्वासत घेतले नाही. सर्व्हिस रस्ता नाही गुरांना रस्ता नाही.मग हेसरकार कोणासाठी काम करते.जर नागरिकांना पाहिजे तृसेते काम करत नसेला तर सरकार पाहिजेच कशाल सरकार हे लोकांच्या जीवावर खेळत आहे . रस्त्याची पहाणी केली असे नाटक हे कमिशन वाढविण्यासाठी आहे असे सुबोध महाले म्हणाले .


​​भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून रस्त्याची पहाणीः सुदिप कोरगावकर
यावेळी बोलताना मगो पक्षाचे केंद्रिय कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर म्हणाले कि हा रस्ता खड्डेमय बनला आहे.यामुळे अनेक अपघात होऊन लोकांचे प्राण  गेले. माञ त्याची सुधारणा केली नाही. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंञी बाबू आजगावकर व सार्वजनिक मंञी दिपक पावसकर यांनी या  राष्ट्रीय महामार्ग कामाची पहाणी केली.माञ खड्डे तसेच आजही आहेत. बाबू आजगावकर आणि दीपक पावसकर हे भाजपची उमेदावारी मिळावी म्हणून रस्त्याची पहाणी करण्यासाठी आले होते.ते खड्डे बुजविण्यासाठी आले नाहीत असे सुदिप कोरगावकर म्हणाले.लोकांच्या पैशांतून सत्कार कररतात फक्त  उमेदवारी मिळविण्यासाठी ः उमेश तळवणेकर
भाजपचे आमदार आणि मंञी हे लोकांच्या पैशांतून सत्कार सोहळे करत आहे.महागाईने जनता ञस्त आहे.पेट्रोल गॕसचे दर वाढले आहेत.ते कमी करण्याची गरज होती.माञ त्यासाठी भाजपचे मंञी प्रयत्न करत नाही. उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी हे सरकारच्या पैशांची उधळपट्टी करत असून मोदीचे दाढी जसजशी वाढत आहे तसे पेट्रोलचे दर वाढत आहेत असे मगो पक्षाचे प्रवक्ते उमेश तळवणेकर म्हणाले .
​​ बाबू पेडणेत कधीतरी येते म्हणून पेडणेच्या लोकांचे त्यांना काही पडले नाही. पेडणे तालुक्यात दोन आमदार आहेत दोन्हीही  सरकार पक्षात  आहेत माञ हा रस्ता ते दुरुस्ती करु शकत नाही असे तळवणेकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: