गोवा 

‘राज्यात स्वार्थी राजकारणाने गाठली परमोच्च पातळी’

मगोप आमदार सुदिन ढवळीकर यांची सरकारवर टीका

पणजीः
जनतेच्या कौलाचा अनादर करून आणि भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेची पायमल्ली करून राज्यात स्थापन केलेले भाजप सरकार पातकी ठरल्याचा आरोप मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केला. खाण उद्योगाचा नायनाट, पर्यटनाची घसरण, राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल, नागरीकांच्या आरोग्याची दैना, बारीक घटकांना उद्धस्त करण्याचा डाव आदींमुळे राज्यात कुणालाच सुख आणि समाधान नाही,असंही ते म्हणाले. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात स्वार्थी राजकारणाने परमोच्च पातळी गाठली आणि धर्म आणि भक्तीचाही बाजार मांडला,अशीही टीका त्यांनी केली.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्याची प्रचंड दैना सुरू असल्याचं मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितलं. इथे कुणीही नागरीक कुठल्याच बाबतीत स्थिरस्थावर होऊ शकत नसल्याचे चित्र पसरले आहे. सगळीकडेच अस्थिरता आणि प्रत्येकाच्या आयुष्यात इतके चढउतार यायला लागलेत की राज्याचं सामाजिक जीवनच अशांत बनलंय, असे निरीक्षण सुदिन ढवळीकर यांनी केलंय.

आपण इतकी वर्षे राजकारणात आहे परंतु इतका कठिण आणि बिकट काळ कधीच पाहीला नव्हता,असे ते म्हणाले. आपण गोंयकार सुशेगाद आणि समाधानी अशी आपली ओळख होती. आज या दोन्ही गोष्टी गोंयकारांच्या आयुष्यातुन हरवल्याहेत. गोंयकारांचा सुशेग गायब झालाय,असं ते म्हणाले. सरकारची चुकीची आर्थिक, सामाजिक धोरणे याला कारणीभूत असल्याचं ते म्हणाले. वास्तविक विद्यमान सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नव्हे तर जनतेच्या कौलाचा अनादर करून केवळ सत्तेच्या जोरावर जनतेचा कौल हिसकावून मिळवलेली ही सत्ता आहे,अशी टीका त्यांनी केली. राज्याच्या इतिहासातील सर्वांत मोठं पक्षांतर भाजपनं घडवून आणलं. पैशांच्या जोरावर काहीही करता येतं,अशी मानसिकता या सरकारात दृढ बनली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: