गोवा 

पर्ये मगोचे माजी उमेदवार सुहास नाईक ‘आप’मध्ये

पणजी :
पर्येतून मगोचे माजी उमेदवार सुहास नाईक यांनी आपमध्ये  प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाने  उत्तर गोव्यात आपली पकड मजबूत अजून मजबूत केली . अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामुळे प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केल्याच सुहास नाईक म्हणाले मंगळवारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह पक्षात रीतसर प्रवेश केला

राज्यात आम आदमी पक्षाची व्याप्ती वाढतअसून कोरोना काळात केवळ आम आदमी पक्षाने सर्व समान्य जनतेला मदत केली या दरम्यान आमदार आणि सरकार बेपत्ता होते केवळ आप पक्षच या  कठीण काळात गोवेकरांच्या ठाम पाठीशी उभा राहिला .ऑक्सिमीटर, ऑक्सिजन कन्सेंट्रेटर किंवा रेशन पुरवत आपली सामाजिक बांधिलकी पक्षाने जपली अशी प्रतिक्रिया सुहास नाईक यांनी दिली गेल्या साडेचार वर्षांत आम्ही केवळ दुःख सहन करत आहोत त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही केजरीवाल मॉडेल पर्ये  आणि गोव्यामध्ये आणण्यास उत्सुक आहोत असही ते पुढे म्हणले

केजरीवाल मॉडेल गोवेकरांना आकर्षित करत आहे तसच पर्वरी चे रहिवासी पक्षाकडे बदलासाठी बघत आहेत हे स्पष्ट असल्याचे आप चे पर्वरीचे विधानसभा प्रभारी विघ्नेश आपटे म्हणाले.

“गोव्याच्या प्रेमामुळेच गोवेकर  आणि राज्यभरातील नेते आपमध्ये सामील होत आहेत,” असे आप चे  सांताक्रुज विधानसभा प्रभारी सुधेश कलंगुटकर म्हणाले.

“आप हे गोव्याचे भविष्य आहे आणि गोव्याच्या लोकांनी स्वीकारले आहे की, आप हा सध्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे.” अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली . “

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: