मुंबई 

रखडलेल्या  प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ‘म्हाडा’चा पुढाकार 

मुंबई :
म्हाडाच्या उपकारप्राप्त आणि पंतप्रधान अनुदान योजनेतील इमारतींचा पुनर्विकास अनेक विकसकांनी गेल्या दहा वर्षांपासून रखडवले आहेत. हे प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी म्हाडाने समिती स्थापन केली आहे. ही समिती पुनर्विकासासाठी आवश्यक आलेल्या निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिफारस करणार आहे.

मुंबईत अनेक विकसकांनी म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींचे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत ठेवले आहेत. यामुळे इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विकसक पर्यायी वास्तव्याचे भाडेही देत नसल्याने नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे रहिवाशी आणि भाडेकरूंनी रखडलेले प्रकल्प राज्य सरकारने मार्गी लावावेत अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडावर जबाबदारी सोपवली आहे. त्याप्रमाणे म्हाडाने रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.

या समितीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, मुख्य अभियंता २ सुनील जाधव, वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार प्रवीण साळुंखे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात अली आहे. तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाचे मुक्ख्य लेखाधिकारी ए. पी. शिंदे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: