क्रीडा-अर्थमतदेश-विदेश

सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्त

जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सत्या नाडेला यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे नाडेला गेली ७ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कंपनीने त्यांच्या नेतृत्वातखाली नवीन उंची गाठली आणि आता त्यांना त्याचे आता बक्षीसच मिळाले आहे. नाडेला जॉन थॉमसन यांची जागा घेणार आहेत. तर जॉन थॉमसन पुन्हा एकदा लीड इंडिपेंडेंट डायरेक्टरच्या भूमिकेत परतणार आहे. थॉमसन यांना २०१४ साली अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्याआधी ते कंपनीच्या बोर्डात स्वतंत्र संचालक होते.

५३ वर्षीय नाडेला यांची २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती. जेव्हा त्यांनी हे पद सांभाळले तेव्हा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात संकटं निर्माण झाली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. ऑफिस सॉफ्टवेअर फ्रँचायझीला पुनरुज्जीवित करताना क्लाउड कंप्यूटिंग, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली. नाडेला हे कंपनीचे तिसरे अध्यक्ष होतील. यापूर्वी बिल गेट्स आणि थॉमसन कंपनीचे अध्यक्ष होते. नाडेलांपूर्वी स्टीव्ह बाल्मर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. थॉमसन हे स्वतंत्र स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत राहतील आणि नाडेला यांच्या भरपाई, यशाचे नियोजन, प्रशासन आणि बोर्ड कार्यांची देखरेख करतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: