गोवा 

मिलिंद नाईक यांच्या सुविधा, अधिकार काढून घेण्याची मागणी

पणजी :

सेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पडलेल्या मिलिंद नाईक यांच्या राजीनाम्याच्या २५ दिवसां नंतरही त्यांना सर्व सुविधा आणि अधिकार दिले जात आहे त्याचा गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी निषेध केला आहे आणि या सर्व सुविधा काढून घ्यावा अशी मागणी केली आहे.

भाजपवर टिकास्त्र सोडताना चोडणकर म्हणाले की, मिलिंद नाईक यांच्यावर सॅक्स स्कँडलचा आरोप झाल्यानंतर भाजप सरकारने त्यांना या प्रकरणातून निर्दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि आता पुन्हा त्यांना सरकारचे संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. “सेक्स स्कँडलच्या आरोपाखाली राजीनामा देणाऱ्या या मंत्र्याला कॅबिनेट मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा अजुनही दिल्या जात आहेत. हे चुकीचे आहे.” असे चोडणकर म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मिलिंद नाईक यांचा राजीनामा स्वीकारून १५ डिसेंबर २०२१ रोजी तो राज्यपालांकडे स्वीकृतीसाठी पाठवला होता. “पदावर नसताना सरकारी सुविधांचा उपभोग कसा घेता येईल. त्यांच्या सर्व सुविधा आणि अधिकार तात्काळ मागे घेण्यात यावे.” अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

चोडणकर म्हणाले की, असंवेदनशील भाजप सरकार महिलांना सुरक्षा आणि सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. “महिलांचे रक्षण करण्याऐवजी भाजप सरकार गुन्हेगार आणि बलात्काऱ्यांना संरक्षण देत आहे. गोव्यातील जनता या फसवणुकीसाठी भाजपला माफ करणार नाही.’’ असे चोडणकर म्हणाले.

“गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी या प्रकरणात लक्ष घालून, ताबडतोब मिलिंद नाईक यांचे अधिकार आणि सुविधा काढून घेण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. भाजप आणि मिलिंद नाईक सत्तेचा दुरुपयोग करत आहेत.’’ असा आरोप चोडणकर यांनी केला.

“माजी मंत्री मिलिंद नाईक सर्व सुविधांचा उपभोग घेत आहेत, ही शरमेची बाब आहे” असे चोडणकर पुढे म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: