क्रीडा-अर्थमतदेश-विदेश

मीराबाई चालली टोकियो ऑलिम्पिकला… 

नवी दिल्ली :
भारताच्या वेटलिफ्टिंग विभागातून अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. आघाडीची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे. ४९ किलो वजनी गटासाठी चानुने ऑलिम्पिकचे तिकिट पक्के केले. २०१७मध्ये मीराबाई चानू विश्वविजेती झाली होती.

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने (आयडब्ल्यूएफ) चानूच्या ऑलिम्पिक पात्रतेविषयी माहिती दिली. मणिपूर येथील २६ वर्षीय चानूने जागतिक क्रमवारीतील गुणांच्या जोरावर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शविली. ४९ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या चानूने ४१३३, ६१७२ असे गुण मिळवले. या गटात चीनची हौ झीहुइ ४९२६, ४४२२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

आयडब्ल्यूएफच्या नियमांनुसार, १४ वजनी गटांपैकी प्रत्येकी अव्वल आठ लिफ्टर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. यामध्ये सात महिला गटांच्या वजनाच्या श्रेणींचा समावेश आहे. ४९ किलो वजनी गटात पहिल्या आठ खेळाडूंमध्ये मीराबाई आणि हौ यांचा समावेश आहे, तर दोन अन्य आशियाई वेटलिफ्टर्सचाही यात सामील आहेत.

पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा १२व्या क्रमांकावर आहे. तो टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवण्यात अपयशी ठरला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: