क्रीडा-अर्थमतगोवा 

‘क्रीडा खात्यातही मिशन ३०% कमिशन’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप

पणजी:
मिशन ३० टक्के कमिशनचा भ्रष्ट प्रकार आता क्रिडा खात्यातही पोहचला असून, सांताक्रूझ फुटबॉल (Football) मैदानावर सिंथेटिक टर्फ घालण्यात असा घोटाळा होत आहे. हा घोटाळा अर्थातच काही चिनी कंपनीला लाभ करुन देण्यासाठी केला जात आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस (congress) समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
सुधारित टेंडरमध्ये अधोरेखित केलेल्या अटींमध्ये असे नमूद केले आहे की लूसोफिनिया गेम्स किंवा नॅशनल गेम्ससाठी ज्या कंपन्यांनी सिंथेटिक टर्फ घातला आहे त्यांनाच  काम करण्यास प्राधान्य दिले जाईल. “ पण राष्ट्रीय किंवा लुसोफोनिया गेम्स या दोनपैकी एकाही खेळात त्याचा वापर केला गेला नाही.” असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले.
क्रिडा मंत्री बाबू आजगावकर व सरकारी सेवक असूनही गोवा फुटबॉल विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असलेले त्यांचे  बंधू डॉ. श्रीकांत अजगावकर यांच्या गेल्या तीन वर्षात चीनच्या संशयास्पद भेटींबाबत चौकशी केली पाहिजे. तसेच भाजपाचे आमदार टोनी फर्नांडिस यांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीरपणाला पाठिंबा देण्यासाठी किती प्रमाणात लाभ मिळाला हे स्पष्ट झाले पाहिजे असे चोडणकर म्हणाले.
युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने कोणतीही मंजुरी न देताही अजगावकर कुटुंबातील इतर सदस्य चीन मध्ये ही डील करण्यासाठी गेला होता काय याचीही चौकशी व्हायला पाहिजे असे ते म्हणाले.
अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये, मातीच्या गुणवत्तेची चाचणी, क्षेत्रासह टर्फ जाडी फिफाने मंजूर करावी असते. केंद्र सरकारने चाचणीची ही तरतूद अनिवार्य केली आहे. गुणवत्ता आणि पारदर्शकतेनुसार निविदा काढतात.
पण सांताक्रूझ येथील या प्रकल्पात चाचणीच्या आवश्यकतेचा उल्लेख नाही, ज्यामुळे प्रकल्प मालकाला सब-स्टँडर्ड प्रोजेक्टच्या कामाचा धोका पत्करावा लागेल. यामुळे चीनमधून डुप्लिकेट टर्फ वापरला जाउ शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे.
सांताक्रूझ मैदानावरील या प्रकल्पाच्या  कामाची पुन्हा निविदा का काढण्यात आली हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. मैदानाच्या मातीचे  परीक्षण करण्यात आले की नाही हे क्रीडा खात्याने सांगितले  पाहिजे.
congressआमचा विश्वास आहे की, राज्याला लुटण्याच्या उद्देशाने काही चिनी कंपन्यांच्या सहकार्याने कमी दर्जाचे साहित्य व उपकरणांच पुरवठा करण्यासाठी अजगावकरांनी करार केला आहे, असे चोडणकर म्हणाले.
टर्फ मैदान उभारण्यात गुंतलेल्या दलालांना  खुश करण्यास नकार दिला तर १.२४  कोटी रुपयांची बचत होईल, असे ते म्हणाले.
तांत्रिक बिड मूल्यांकनाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या संपूर्ण निविदा प्रक्रियेवर आम्ही नजर ठेवणार आहोत, असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे. सरकारी अधिकाऱ्यानी भ्रष्टाचाराच्या दबावाखाली जाऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्री म्हणून त्यांचे दिवस मोजत आहोत आणि ते निवृत्तीच्या मार्गावर आहेत, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!