गोवा 

पेडण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘या’ संस्थेचा पुढाकार

पेडणे ( निवृत्ती शिरोडकर )

भागातील वारखंड पंचायत क्षेत्रामध्ये कोविडचा संसर्ग पसरु नये म्हणून एकूण ४० घरे, १ शाळा, ३ मंदिरे व अनेक दुकानांची आणि आजूबाजूच्या परिसराची मिशन फॉर लोकल-पेडणेच्या वतीने निर्जंतुकीकरण करून देण्यात आली.

कोरगाव येथील मिशन फॉर लोकल या संघटने मार्फत राजन कोरगावकर यांनी मागच्या एका महिन्यापासून ते आता पर्यंत 1500घरांचे निर्जंतुकीकरण केले . कोरोना काळात हि कामगिरी करत असताना एखाद्या घरात जर कोरोना बाधित रुग्ण सापडला तर त्यांचे घरात शिवाय त्या वाड्यावरील सर्व घर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राजन कोरगावकर यांनी हाती घेतली आहे .

कोरोना काळ हा कठीण काळ समजला जातो . पेडणे तालुक्यातील कोरोनाची स्थिती हळू हळू सुधारत आहे , अजूनही 650 सक्रीय कोरोना ​रुग्ण ​तालुक्यात आहे .

कोरोनावर मात करण्यासाठी सरकार , सरकारातील मंत्री आमदार , सर्व पक्षाचे कार्यकर्त्ये नेते , सामाजिक संस्था कोरोनाची साखळी मोडीत का​​ढण्यास कार्यरत आहे . त्यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर , आमदार दयानंद सोपटे , मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर , मगोचे जीत आरोलकर , प्रवीण आर्लेकर , कॉंग्रेसचे सचिन परब , जिल्हा पंचायात सदस्य रंगनाथ कलशावकर , पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस हे वैयक्तिक पातळीवर कोरोना योद्धे बनून काम करत आहेत .

त्या पलीकडे जावून कोरगाव येथील मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी सुरुवातील कोरगाव पंचायत क्षेत्रात , नंतर वजरी , वारखंड या भागात घरांचे  निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला . सुरुवातीच्या कोरोना काळात पेडणे अग्निशमन दल ज्या घरात कोरोना सापडला त्याचे घर परिसरात निर्जंतुकीकरण केले जायचे. दुसऱ्या लाटेत हे काम बंद असल्याने सामाजिक संघटनांनी आता पुढाकार घेतलेला आहे .

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी सांगितले कि, सुरुवातीला आम्ही ज्यांच्या घरात कोरोना संसर्ग सापडला तेच घर  निर्जंतुकीकरण  करत होतो , आता ग्रामास्थांचीच मागणी आहे कि ज्या वाड्यावर कोरोना संद्सर्ग सापडला त्या परिसरातील सर्व वाड्यावरील घरांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे . दिवसेंदिवस नागरिकांची मागणी वाढत आहे , आता पर्युंत जवळ जवळ 1500 पेक्षा जास्त घरांचे निर्जंतुकीकरण केले , दिवसाला 10 ते 20 घरे केली जातात , दिवसाला १०० घरांचे  निर्जंतुकीकरण करावे म्हणून मागणी असते. 1500 घरांचे निर्जंतुकीकरण तर 900 पेक्षा जास्त टेकर द्वारे पाणी पुरवठा केल्याची माहिती राजन कोरगावकर यांनी दिली. या कार्याने आपल्याला समाधान मिळते आणि ते समाधान पैशाने मिळू शकत नाही असे राजन कोरगावकर यांनी सांगितले .
pernemकोरगाव येथील मिशन फॉर लोकलचे कार्य कसे सुरु आहे या विषयी भेट देवून जाणून घेतले असता,  राजन कोरगावकर हे घराघरात निर्जंतुकीकरण करतात त्या ठिकाणी ते उपस्थित असतात , नागरिकही आपल्या घर परिसरात कधी निर्जंतुकीकरण करणार यासाठी वाट पाहत असल्याचे​ ​चित्र दिसत आहे .

यावेळी . राजन बाबूसो कोरगांवकर (मिशन फॉर लोकल, पेडणे) वसंत देसाई (पंच सदस्य, कोरगांव पंचायत) राजू नर्से (माजी सरपंच, कोरगांव पंचायत). किसन कोरगांवकर,. महेश हरमलकर  वासुदेव गावडे . सुनील अमेरकर. निश्चल शेट्ये व बरेच इतर नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: