गोवा 

मांद्रेच्या राजकारणात आमदार सोपटे यांचे वर्चस्व

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मांद्रे मतदारसंघातील राजकारणात आजही भाजपचा जुना गट आणि आमदार सोपटे यांचा गट या दोन गटात अडकले आहे. भाजपा विरुद्ध भाजपा असे राजकारण या मतदारसंघात चालू आहे. मात्र सध्यातरी आमदार दयानंद सोपटे यांचेच या मतदारसंघात वर्चस्व आहे. सरळ लढत झाली तर चमत्कार घडू शकतो मात्र तिघांच्या भांडणात आमदार सोपटे यांचा लाभ होतो.

आमदार दयानंद सोपटे यांच्यासमोर सध्या मगोचे जित आरोलकर आणि काँग्रेसचे सचिन परब यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी आमदार दयानंद सोपटे यांचे समर्थक आणि पक्षीय संघटनेच्या कार्याची बांधणी मजबूत असल्याने कितीही वादळे आले तरी आमदार सोपटे समर्थपणे पेलताना दिसत आहे .कारण त्यांना मागच्या 25 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव आहे ,आमदारकी सोडूनही ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षच्या चिन्हावर निवडून येऊ शकतात ,पक्षापुढे व्यक्ती मोठी नाही हे भाजपाने या अगोदरच दाखवून दिले ज्यांनी पक्षाध्यक्ष असताना राज्यात दोन वेळा भाजपचे सरकार आणले त्या तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांनाही पक्षाने किंमत दिली नाही ,2019 च्या पोट निवडणुकीत तत्कालीन भाजपच्या चिन्हावर तीन वेळा निवडून येऊन मुख्यमंत्री बनलेले प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना विश्वासात न घेता सोपटे यांना प्रवेश दिलाच शेवटी उमेदवारी देऊन सुद्धा त्यांना आमदार मतदारांनी दुसऱ्यादा केले ,त्यावेळी माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या गटाने पार्सेकर यांना बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहण्याची गळ घातली दबाव घातला ,कार्यकर्त्यांच्या हट्टापायी एक सभा घेतली त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आणि पार्सेकर यांनी जाहीर केले की योग्य वेळी योग्य निर्णय  घेऊ असे जाहीर केले आणि शेवटच्या क्षणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला ,जुन्या कार्यकर्त्यांना कोणी वालीच मिळाला नाही  . जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हा सदस्य आणि पार्सेकर यांचे कट्टर समर्थक अरुण बानकर याच्या नावाची साधी शिफारस केली गेली नाही ,त्याच वेळी मांद्रेत भाजपा विरुद्ध भाजपा असे राजकारण सुरू झाले .

आमदार दयानंद सोपटे यांच्या विरुद्ध सध्या मगोचे नेते जित आरोलकर  आणि काँग्रेसचे सचिन परब यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे. 2019 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले जित आरोलकर यांना पार्सेकर गटाचा पाठिंबा मिळाला होता त्यातील दीपक कलंगुटकर यांनी पक्षाला राम राम करत गोवा फॉरवर्ड ला साथ देऊन हातात नारळ घेतला त्यामुळे आगामी निवडणुकीत तेच गोवा फॉरवर्डचे उमेदवार असणार आहे तशी घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

आमदार दयानंद सोपटे यांच्याविरुद्ध मगोचे जित आरोलकर, काँगेसचे सचिन परब आणि गोवा फॉरवर्डचे दीपक कलांगुटकर हेच संभाव्य उमेदवार  म्हणून सध्या तरी चर्चेत आहे. पण बहुरंगी लढतीत आमदार दयानंद सोपटे बाजी मारत गेले त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी परत एकदा त्यांचे समर्थक सज्ज झाले आहेत.

आमदार दयानंद सोपटे हे 2012 च्या विधानसभेच्या निवडणुकापूर्वी पेडणे भाजपा आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवली तिथे ते स्वकीयकडून पराभूत झाले , मध्यंतरी काळात सोपटे यांनी भाजपात येण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुख्यमंत्री पार्सेकर असताना सोपटे यांना पुन्हा भाजपात येण्यासाठी विरोध केला सोपटे जर भाजपात येत असेल तर दीपक कलांगुटकर यांनी हिरवा कंदील  द्यायला हवा ,पर्रिकरांच्या आणि पार्सेकर यांच्या काळात दीपक किती मोठा होता याची प्रचिती आली ,मात्र आपल्याला विरोध होतानाही सोपटे यांनी आपला पराभव मान्य करत 2017 च्या निवडणुकीत परत एकदा काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि मुख्यमंत्री पदावर असताना सोपटे यांनी पार्सेकर यांचा पराभव करून देशात नवा राजकारणातला इतिहास घडवला.  आणि नंतर 2019 साली पुन्हा एकदा काँग्रेसच्या आमदारकीचा त्याग करत भाजपात सोपटे यांनी प्रवेश केला आणि त्याकाळात ते आमदारही झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: