देश-विदेश

पंतप्रधानांनी केले आरोग्यसेवा कर्मचाऱ्याचे कौतुक 

नवी दिल्ली :
कोविड प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करून समाजासमोर नवे उदाहरण निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे कौतुक केले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या ट्वीट संदेशाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात लिहिले आहे की, “कोविड प्रतिबंधक लस वाया घालविण्याचे  प्रमाण कमी करून आपले आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांनी समाजासमोर नवे उदाहरण निर्माण केले आहे. कोविड-19 विरोधातील लढा मजबूत करण्यासाठी कमीत कमी प्रमाणात लस वाया जाऊ देण्याला मोठे महत्त्व आहे.”
coronavirus

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: