गोवा 

‘विमाने फक्त विमाने उडवण्यासाठी नाहीत, तर…’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर)
विमानतळ प्रकल्प केवळ विमाने उडवण्यासाठी नव्हे तर गावचा तालुक्याचा लोकांचा विकास करण्यासाठी उभारला जात आहे . विमानतळासाठी केवळ ५० पन्नास हजार झाडे तोडली , त्याजागी मात्र ५ लाख नवीन झाडे लावण्यात आली आहे . जे एनजीओ प्रकल्पासाठी गोंधळ घालतात , आवाज उठवतात किंवा स्वत:ला पर्यावरणप्रेमी समजतात त्यांनी किती झाडे आजपर्यंत राज्यात लावली असा प्रश्न मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मोपा येथे कडशी नदीवर जलसिंचन खात्याअंतर्गत ५ कोटी रुपये खर्च करून कच्चे पाणी मोपा पठारावरील झाडांसाठी पाणी पुरवठा करण्याची योजना अंतर्गत कामाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते .यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर ,जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे बायोडायव्हरसिटीचे सदस्य सचिव प्रदीप सरमुकादम , माजी सरपंच पल्लवी राऊळ, नगराध्यक्ष उषा नागवेकर ,माजी सरपंच जयप्रकाश परब , उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर , जलसिंचन खात्याचे अधिकारी प्रमोद बदामी पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .

मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी बोलताना काही एनजीवो विकासाला विरोध करतात ,स्थानिक नागरिकांनी झाडांची नर्सरी करणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन करताना याच वातावरणात तयार केलेले झाड या वातावरणात वाढणार असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले . झाडासाठी आता पाणी सोय कडशी नदीचे पाणी दिले जाणार उन्हाळ्यात या नदीत तिळारीचे पाणी आणून सोय केली जाईल , एकूण पाच हेक्टर जमिनीत झाडे लावली जाणार व त्यासाठी पाण्याची सोय केली जात असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले .

‘वेळप्रसंगी प्रकल्पाच्या विरोधात आवाज’
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना मोपा विमानतळ हा लोकांसाठी खेचून आणला आहे , नोकऱ्या जर स्थानिकाना मिळाल्या नाही तर वेळ प्रसंगी आपण आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही .भाजपाचे आमदार विकास कामे करण्यासाठी मागे पडणार नाही , मात्र सर्वाना सरकारी नोकऱ्या देणे शक्य नाही, मात्र मोपा विमानतळामुळे १०० टक्के नोकऱ्या मिळतील अशी ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना सरकारी नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे , जे काही नोकऱ्या आहेत त्या सरकारी नोकऱ्या आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे मागितलेल्या असल्याचे सांगितले .

मोपा विमानतळ नोकऱ्यासाठी पूर्व प्रशिक्षण
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना ज्या नोकऱ्या विमानतळ प्रकल्पात उपलब्ध होणार आहे , त्या संबधी पूर्वप्रशिक्षण वेगवेगळे कोर्स कंपनी सुरु करणार आहे आणि १०० टक्के नोकऱ्या प्रशिक्षण घेणाऱ्याना मिळणार असल्याचे सांगितले .

 

‘परत मोपा हरित करुया’
जिल्हा पंचायत सदय सीमा खडपे यांनी बोलताना मोपा विमानतळामुळे बऱ्याच झाडांची कत्तल करावी लागली . मोपा पठारावर झाडे लावल्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर पाणी झाडाना नसते ,त्यामुळे  ती झाडे करपली जायची , आता सरकारतर्फे पाण्याची योजना मार्गी लागल्यानंतर मोपा हरित करुया असे आवाहन सीमा खडपे यांनी केले . या प्रकल्पासाठी ज्यांनी शेतजमीन दिली त्यानाही नुकसानभरपाई द्यायला हवी असे सांगितले .बायोडायव्हरसिटीचे सदस्य सचिव प्रदीप सरमुकादम यांनी बोलताना पेडणे तालुक्यात जास्तीतजास्त झाडे लावलेली आहे , आणि यंदा एक लाख वीस हजार झाडे हि केवळ पेडणे तालुक्यात नागरिकांनी जैविकविविधता मार्फत वितरीत करून लागवड केल्याचे सांगितले . स्थानिक युवकाना प्रोत्साहन देवून झाडांची नर्सरी तयार करून त्यांच्याकडून ती झाडे घेवून नागरिकाना दिल्याचे ते म्हणाले  .
या वेळी स्थानिक युवकाने नर्सरी केली त्यांच्याकडून सरकारने झाडे विकत घेली त्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून धनादेश देण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: