गोवा 

विमानतळावरील मातीने उध्वस्त केल्या शेतजमीनी

पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​) :​
तालुक्यात होवू घातलेल्या मोपा हरित विमानतळ प्रकल्पामुळे विकासासाची दालने उघडली जाईल अशी अपेक्षा होती , मात्र शेतकऱ्यांच्या शेती , बागायती उजडण्याचे काम सध्या जोरात आहे .

मोपा विमानतळाचे काम सध्या युध्य पातळीवर चालू ​​आहे. या प्रकल्पामुळे परिसरात विविध समस्या नुकसानी होतानाचे चित्र दिसत आहे .याचाच एक भाग म्हणून मोपा प्रकल्पावरून थेट माती धोंडे दगड उगवे येथील एकनाथ महाले यांच्या शेतात बागायतीत घुसले . त्यामुळे त्याला लाखो रुपये नुकसान झाले आहे ,. त्याच्या चार एकर शेतजमनीत हि माती दगड धोंडे गेलेले आहेत . त्यामुळे हि शेती नापीक बनली. नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी विमानतळ प्राधिकरण संचालक  शानबाग यांच्याकडे आपली कैफियत मांडली. सुरुवातीला नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली , मात्र आता ते नकार देतात अशी माहिती शेतकरी एकनाथ महाले यांनी दिली. मोपा विमानतळावरून थेट माती-दगड-धोंडे एकनाथ महाले यांच्या शेतात आले आहे , रस्त्यावरही माती दगड जमल्याने मार्ग बंद आहे.

मोपा विमानतळ संघर्ष समितीचे निमंत्रक तथा मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी प्रतिक्रिया देताना विमानतळाच्या बांधकाम कंपनीचा  बेजबाबदारपणा वाढलेला आहे . नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष चालू आहे . मागच्या आठवड्यात सरकार पक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निपाणीकर याना निवेदन देवून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती , त्याची आजपर्यंत कार्यवाही झाली नसल्याने महाले यांनी नाराजी व्यक्त केली .

सरकार एका बाजूने शेतीव्यवसाय करण्यासाठी  विविध योजना राबवत असतात, काही ठिकाणी आमदार मंत्री सामाजिक कार्यकर्त्ये शेतकऱ्यांना मोफत बियाणे खत वितरीत करतात , शेतीच नस्ट झाली तर मग या योजना कुणासाठी असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे

उगवे परिसरातील अधिकाधिक शेती हि तेरेखोल नदीच्या परिसरात आहे , त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच्या पलीकडे स्थानिकांची घरे आहेत . तेरेखोल नदीत अमर्याद रेती उपसा झाल्यामुळे उगवेतील  अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या नदीने गिळकृत केल्या आहेत नदीचे पात्र शेतात रुंदाव्लेले आहे , त्यावर आजपर्यंत सरकारने कोट्याच उपाययोजना केल्या नाहीत . आता उर्वरित शेतात बागायतीत विमानतळावरून माती शेतात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: