Homeगोवा 

 मोरजी ​टेंबवाडा मंदिर प्रांगणात पाणीच पाणी

पेडणे  ​(​निवृत्ती शिरोडकर​) :​

​मुसळधार पावसामुळे मोरजी पंचायतीने मान्सूनपूर्व गटारे उपसली नसल्याचा परिणाम ​​टेंबवाडा येथील मोरजे कुलदेवता मंदिर परिसरात झाला आहे​. ​मंदिरांच्या प्रांगणात पूर्णपणे पाणी भरले आहे , आणि हि स्थिती अशीच राहिली तर मंदिर बांधकामाला धोका निर्माण होवू शकतो , त्यासाठी पंचायतीने त्वरित मंदिर समोरील व मागच्या बाजूने रस्त्याची गटारे आहेत ती गटारे त्वरित साफसफाई करावी अशी मागणी मंदिर महाजन मोरजे महाजनांनी केली आहे​. ​

मागच्या तीन दिवसापासून सलगपणे पडत असलेल्या पाऊसाने थैमान घातले आहे. सर्वत्र रस्त्यावर शेतात पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसत आहे​. ​

मोरजी पंचायतीने मान्सूनपूर्व कामे वेळेत न केल्याने आणि गटार व्यवस्था नीटनेटकी केली नसल्याने आणि गटारेचे तीन तेरा वाजल्याने सर्वत्र गटाराचे पाणी रस्त्यावर साचून राहते . आता या मंदिरातील प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भक्तगण नाराजी व्यक्त करत आहे , मंदिरांच्या दोन्ही बाजूला रस्त्ये आहेत आणि त्या ठिकाणी गटाराची स्थिती पाहिल्यास भयंकर झाली आहे​. ​

पंचायतीने या भागाकडे लक्ष देवून उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: