गोवा 

‘मोरजी करणार प्लास्टिक आणि कचरामुक्त’

सतीश शेटगांवकर यांनी जाहीर केली विशेष स्पर्धा 

पेडणे ​(प्रतिनिधी) :​
मोरजी गाव ​नेहमीच स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी गाव कचरा व प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी ​विशेष स्पर्धेची घोषणा केली आहे. यानुसार जे  रहिवासी आपला प्रभाग कचरा व प्लास्टिक मुक्त ठेवणार ​त्यांना पुरस्कार ​देण्यात येणार असल्याचे सतीश शेटगांवकर यांनी सांगितले. यासाठी लवकरच एकूण ९ प्रभागातील मुख्य जागृत युवक नागरिकांची बैठक बोलावून एक समिती स्थापन करून पुढील कार्यवाही ​करण्यात येणार आहे. 

मोरजी पंचायत क्षेत्रात एकूण नऊ प्रभाग आहेत या नऊही प्रभागातील गारबेज दररोज कामगारामार्फत घरोघरी जावून पंचायत उचलत असते , त्यासाठी प्रत्येक घरमालकाकडून वर्षाला ३६५ रुपये वसूल केले जातात .​ ​रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला परिसरात प्लास्टिक गार्बेज असेल आणि पंचायतीला किंवा एका सामाजिक माध्यमाच्या ग्रुपवर टाकले तर लगेच समिती दखल घेते .

काही नागरिक आपला कचरा ओहळात मोकळ्या जागेत रस्त्याच्या बाजूला फेकून देवून परिसर विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहेत . याला आळा बसावा आणि आपला परिसर प्रत्येकाने स्वच्छ ठेवावा त्यासाठी हा पुरस्काराचा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे .

मोरा सारख्या आकाराचा मोरजी गाव .सर्वांगसुंदर निसर्गाचा वरदहस्त , पर्यटनाच्या नजरेतून या गावाला फार महत्व आहे . देश विदेशातील पर्यटक या किनारी भागात येतात , त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्ची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते . या गावाला शहरीकरणाचे जबरदस्त वेध लागलेले आहेत विद्यमान पंचायत मंडळाने सार्वजनिक हिताची कामे व प्रकल्प ​प्राधान्यक्रम दिलेला आहे. ​

जुन २०१७ रोजी पंचायत निवडणुका झाल्या आणि आणि केवळ एक वैशाली शेटगावकर यांच्या रुपात जुना चेहरा पंचायतीवर परत निवडून आला . तर आठ नवीन चेहऱ्यांना मोरजीवासियांनी संधी दिली . विलास मोरजे , अमित शेटगावकर , वैशाली शेटगावकर , उमेश गडेकर , शांती पोके , प्रकाश शिरोडकर , पवन मोरजे, संपदा शेटगावकर ,तुषार शेटगावकर हि पंच मंडळी निवडून आली असून या पंचायतीवर आमदार दयानंद सोपटे यांचे वर्चस्व आहे .

सरपंच पद हे महिलांसाठी राखीव असल्याने पहिली दोन वर्षे शांती पोके याना तर उर्वरित तीन वर्ष सरपंच म्हणून वैशाली शेटगावकर यांची निवड झाली आहे असा अलिखित करार झाला होता  . उपसरपंच म्हणून अमित शेटगावकर यांची निवड झाली आहे . अमित शेटगावकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्या नंतर लगेच त्यांनी आपल्या प्रभागात मतदारांना जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता करण्यावर भर दिली , विकास कामे आपल्या प्रभागात चालू असताना गावच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे , लोकांचा पैसा सार्वजनिक कामासाठी सोयी सुवीधासाठी यावा यासाठी त्यांनीगावातील काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या कडून आर्थिक मदत घेवून सार्वजनिक उपक्रम राबवले आहेत , त्यातून एक कचरा वाहन व रुग्णवाहिका गावासाठी उपलब्ध  करून दिले आहेत .

satish shetgaonkarयापूर्वीच्या पंचायत मंडळाला करायला जमले नाही ते या विद्यमान पंचायत मंडळाने करून दाखवले, सर्वात प्रथम मोरजीगाव स्वच्छ करण्याच्या नजरेतून पावुले उचलून कचरा मुक्त गाव करण्यासाठी घरोघरचा कचरा उचलण्याची मोहिम यशस्वी पणे राबवली आहे .  गावातील घराघरातील​ ​कचरा​ ​गोळा केला​ ​जातआहे ,कचरा गोळा करण्यासाठी अमित​ ​शेटगावकर व पंचायत​ ​मंडळाने पुढाकार घेवून गावातील दानशूर व्यक्ती स्व. नामदेव मुकुंद शेटगावकर यांच्याकडून १७ लाख आर्थिक मदत घेवून त्यांनी कचरा वाहन पंचायतीसाठी घेतले.

​या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गावातील कचरा मुक्त करण्यासाठी आता जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी नवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे .​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: