सातारा 

९ मोटारसायकल्स चोरणारी टोळी गजाआड 

सातारा, महेश पवार :
कराड परिसरातील उंब्रज येथे  मोटारसायकल चोरी करणारी टोळी वावरत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका इसमाला ताब्यात घेतले व त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी कोपर्डे हवेली तालुका कराड येथून एक मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले यानंतर त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर करून दोन दिवसांची पोलीस कोठडी ची मागणी केली.

या आरोपीनी कराड शहर परिसरात पाच मोटारसायकल तर कराड तालुका परिसरातून एक तर सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथून एक व तासगांव येथून दोन मोटारसायकली आणि मुंबई येथील कोमोठे येथे एक मोटारसायकल अशा ९मोटारसाकली चोरल्याची कबूली केल्याची माहिती समोर आली आहे . ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे , सहायक फौजदार जोतीबा बर्गे ,अतीश घाडगे,शरद बेबले, आदींनी सदरची कारवाई केली.

karhad police

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: