क्रीडा-अर्थमत

मुथूट्टु मिनिचा एनसीडी पब्लिक इश्यु खुला

मुंबई :
मुथूट्टु मिनि फायनान्सर्स लि. कंपनी सुवर्ण कर्ज क्षेत्रामध्ये डिपॉझिट न घेणारी सिस्टेमिकली इम्पॉर्टंट एनबीएफसी आहे. या कंपनीतर्फे त्यांचे सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड डिबेंचर्स खुले करण्याची घोषणा केली. प्रत्येक डिबेंचरचे दर्शनी मूल्य रु. 1,000 असेल.

15व्या एनसीडी इश्युचे एकूण मूल्य रु. 125 कोटी इतके आहे. यात रु.125 कोटींपर्यंतचे ओव्हर-सबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसे झाल्यास त्याचे एकूण मूल्य रु.250 कोटी असेल. या एनसीडी इश्युमध्ये एनसीडींच्या सबस्क्रिप्शनसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात कूपनचे दर वार्षिक 8.75% – 10.00% आहेत. एनसीडी इश्यु 18 ऑगस्ट, 2021 रोजी खुला झाला आणि 9 सप्टेंबर, 2021 रोजी बंद होईल. हा कालावधी लवकर बंद होण्याचा किंवा याचे विस्तारीकरण होण्याचा पर्याय आहे.

31 मार्च 2021 रोजी एमएमएफएलकडे 3,86,110 सुवर्ण कर्ज खाती होती. यापैकी बुहतांश खाती ग्रामीण आणि निमशहरी भागांतून होती. त्यांचे एकूण मूल्य 1,935.10 कोटी होते. त्यांच्यातर्फे देण्यात आलेल्या एकूण कर्जापैकी आणि अॅडव्हान्सेसपैकी हा वाटा एकूण 97.04% आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांतील परतावा जो आर्थिक वर्ष 2019मध्ये 19.17% होता तो वाढून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 19.57% झाला. आर्थिक वर्ष 2021साठी त्यांचे निव्वळ नॉन-परफॉर्मिंग असेट्स 0.75% होतेजे आर्थिक वर्ष 2019मध्ये 1.39% होते.

सोन्यावरील कर्जाच्या व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्यातर्फे मायक्रो-फायनान्स लोनडिपॉझिटरी पार्टिसिपंडमनी ट्रान्सफरइन्श्युरन्स ब्रोकिंगपॅन कार्डशी संबंधित आणि ट्रॅव्हल एजन्सी सेवा प्रदान करण्यात येतात.

निनन मथाई मुथुट्टू यांनी 1887 साली या कौटुंबिक व्यवसायाची स्थापना केली. आता या कंपनीचे नेतृत्व अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक निझी मॅथ्यू आणि व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मुथुट्टू यांच्या हाती आहे.

या इश्युअंतर्गत असलेल्या एनसीडीच्या प्रत्येक पर्यायाच्या अटी खाली नमूद केल्या आहेत:

या इश्युमधून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग ऑनलवर्ड लेंडिंग, फायनान्सिंग आणि कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलीची व व्याजाची परतफेड/प्रिपेमेंट (किमान 75%) आणि उरलेल्या निधीचा वापर (25%पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येईल.

13 ऑगस्ट 2021 या तारखेच्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड एनसीडी बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

विवरो फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी लीड मॅनेजर्स आहेत.

मिटकॉन ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड हे डिबेंचर ट्रस्टी आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: