सातारा 

सुनिल माने म्हणतात, ‘नहरवाडीत पूलच नाही…’

सातारा (महेश पवार) :
कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी गावातील लोकांनी ‘राष्ट्रमत’कडे आपली कैफियत मांडली की अनेक वर्षे झाली कमंडलू ओढ्याच्या पुलावरून थोडा जरी पाऊस झाला की पाणी जाते. कित्येक वर्षांपासून इथे उंच पूल व्हावा म्हणून स्थानिकांची मागणी केली जात आहे. पण याठिकाणी ना प्रशासन किंवा स्थानिक नेते लक्ष घालत नाहीत.

 

चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने याठिकाणचा आताच पूल अजून पाण्याखालीच आहे. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. आणि इथल्या नागरिकांची कोणीही साधी विचारपूसहि केलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिक आता नेत्यांवर आणि प्रशासनावर तीव्र नाराज असून, आम्ही जिवंत आहोत, हे तरी बघायला कोणी येणार कि नाही? असा उद्विग्न प्रश्न विचारला आहे.

सुनील माने

दरम्यान, या ठिकाणचे स्थानिक नेते सुनील माने यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले  कि, या ठिकाणी आम्ही लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. पण नरहरवाडीमध्ये असा कोणता पूलच अस्तित्वात नाही.

या संदर्भात आम्ही नगराध्यक्ष आनंदा कोरे रहिमतपूर नगरपालिका यांच्याशी देखील दुरध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवून दिला आहे लवकरच यांवर उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: