देश-विदेश

कोरोनाने केली मोदींच्या लोकप्रियतेत घट

नवी दिल्ली :
​करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरुन केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका होता असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’च्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरलाय.

जगभरातील विविध देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची ताजी आकडेवारी समोर आलीय. या मध्ये १ एप्रिल ते ११ मे दरम्यान मोदींच्या लोकप्रियतेमध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. एक एप्रिलपूर्वी मोदींची लोकप्रियता म्हणजेच अ‍ॅप्रूवल रेटिंग ७३ टक्के इतकी होती. मात्र ११ मे रोजी त्यामध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन ती ६३ वर आली. म्हणजेच एक मे ते ११ मे दरम्यान मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग १० टक्क्यांनी कमी झालं. मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक मे आधी २१ टक्क्यांवर असणारी हे रेटींग ११ मे नंतर ३१ टक्क्यांवर पोहचलीय.

केवळ मॉर्निंग कन्सल्टच्या अ‍ॅप्रूवल रेटिंगमध्येच नाही तर भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्येही मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. २३ राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांमधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आळं. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेआधी मोदींची लोकप्रियता ५७ टक्क्यांपर्यंत होती. मात्र ११ मे पर्यंत यामध्ये ९ टक्क्यांची घसरण झाली आणि ती थेट ४८ टक्क्यांवर आली. पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियता ५० टक्क्यांच्या खाली आल्याचं संस्थेचं म्हणणं आहे.

यापूर्वी मोदींची लोकप्रियता नोटबंदी, कृषी कायदे, सुधारित नागरिकत्व कायदा यासारखे निर्णय आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतरही कायम राहिली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका मोदींच्या लोकप्रियतेला बसल्याचं या दोन्ही सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे.​

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: