देश-विदेश

मोदींच्या विस्तारित मंत्रिमंडळात ‘यांना’ मंत्रीपदे

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.ज्यामध्ये प्रादेशिक, जातीय, सामाजिक अशे अनेक समतोल साधून बऱ्याच नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी भेटली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात,36 नव्या मंत्र्यांचा समावेश असून, 15 कॅबिनेट मंत्री, तर28 राज्यमंत्री असणार आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळात आता 77 मंत्री असणार आहेत त्यातील 73 भाजप व उर्वरित 4 मंत्री अपना दल, जनता दल, लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदींचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले असून येणाऱ्या विधानसभा निवडणूका लक्षात घेता समतोल साधण्यात आला आहे आणि त्याचमुळे उत्तर प्रदेशला सर्वात जास्त 7 मंत्रीपदे मिळाली आहेत.

पण असे अनेक फेरबदल करताना जवळपास 12 विद्यमान मंत्र्यांना नारळ देण्यात आला आहे. मात्र संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र खात्यांच्या प्रमुख चार मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही जे विद्यमान मंत्री आहेत तेच हा पदभार पुढे नेतील मात्र आरोग्य, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती-प्रसारण, विधि, सामाजिक न्याय, रसायने व खते, नागरी पुरवठा, अवजड उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, कामगार कल्याण अशा मंत्रालयांसाठी नवे केंद्रीय तसेच नवे राज्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.

या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरातमधील मनसुख मांडवीय हे आता केंद्रीय आरोग्य मंत्री असतील

या नवीन मंत्रिमंडळात कुणाला कुठले खाते :
अमित शहा – सहकार मंत्रालयाची जबाबदारी
नारायण राणे – सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग मंत्रालय
कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री
मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्रालय, खते- रसायन मंत्रालय
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद
पियूष गोयल – वस्त्रोद्योग मंत्रालय
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे – नागरी उड्डाण मंत्रालय
पुरषोत्तम रुपाला – दुग्धविकास, मत्स्योत्पादन मंत्रालय
स्मृती ईराणी – आता केवळ – बालविकास मंत्रिपद
भागवत कराड – अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री
आर के सिंह – केंद्रीय कायदे मंत्री
मिनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री
गिरीराज सिंह – ग्रामविकास मंत्रालय
आर के सिंह – ऊर्जा मंत्री
किरन रिजीजू – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
पशुपती पारस – अन्न प्रक्रिया उद्योग
मीनाक्षी लेखी – परराष्ट्र राज्य मंत्री
अनुराग ठाकूर – युवा आणि क्रीडा मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पशुपती पारस – अन्न प्रक्रिया मंत्रालय
भुपेंद्र यादव – श्रम मंत्रायल
भारती पवार – आरोग्य राज्यमंत्रालय

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: